उरण : शनिवारी गणेशोत्सव व ईद या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर उरण मधील न्हावाशेवा व मोरा सागरी पोलीस ठाणे यांची उरणमध्ये संयुक्तिक रंगीत तालीम घेण्यात आली. उरणच्या चारफाटा एसटी स्टॅन्ड येथे हे प्रात्येशिक करण्यात आले. आगामी गणेश उत्सव व ईद-ए- मिलाद या सण/उत्सवाच्या अनुषंगाने एस.टी.स्टँड, चारफाटा, उरण येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

या दंगा काबू योजची रंगीत तालीम करण्यात आली. मध्ये उरण,न्हावा शेवा व मोरा पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक,पोलीस हवालदार,अंमलदार यांचा समावेश होता. तसेच सिडको अग्निशमन दलाचे जवान,इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी रुग्णवाहिका यांचाही समावेश होता अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी दिली आहे. तर शुक्रवारी सायंकाळी उरण शहरातून पोलीसांनी रूट मार्च काढण्यात आला होता. सणाच्या निमित्ताने जनतेने सावधानता बाळगून शांततेत सण साजरा करावेत असे आवाहन पोलीसांनी केली आहे.