• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. vba declared vasant more as pune loksabha official candidate spl

वसंत मोरे पुणे: मनसेला सोडचिठ्ठी ते वंचितकडून उमेदवारी! काय काय घडले?

कोणत्या पक्षाने संधी दिली नाही तर, लोकसभा निवडणूक अपक्ष लढू अशी भुमिका वसंत मोरे यांनी घेतली होती.

April 3, 2024 12:33 IST
Follow Us
  • vasant more vba candidate
    1/9

    पुण्यातील मनसेचे फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी १२ मार्च २०२४ या दिवशी मनसेला सोडचिठ्ठी दिली. (सर्व फोटो-वसंत मोरे फेसबुक पेज)

  • 2/9

    मागच्या दोन वर्षांपासून त्यांचा आणि पुण्यातील पक्ष संघटनेचा वाद सुरू होता. लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असताना पक्षाची स्थिती निवडणूक लढवण्यासारखी नसल्याचा अहवाल राज ठाकरेंपर्यंत पाठवला जात असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला होता.

  • 3/9

    १८ वर्ष सुरू असलेला मनसेतील प्रवास वसंत मोरे यांनी थांबवला. त्यानंतर त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

  • 4/9

    वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होणारे फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर करत आपला राजीनामा दिला होता.

  • 5/9

    पुणे महानगरपालिकेत विरोधीपक्षनेते पद भूषविलेले वसंत मोरे कात्रजमधून मनसेचे नगरसेवक राहिलेले आहेत.

  • 6/9

    राजीनामा दिल्यानंतर दरम्यानच्या काळात त्यांनी शरद पवार, प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.

  • 7/9

    कोणत्या पक्षाने संधी दिली नाही तर, लोकसभा निवडणूक अपक्ष लढू अशी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती.

  • 8/9

    त्यानंतर काल वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत वसंत मोरे यांना पुणे येथून उमेदवारी जाहीर केली आहे.

  • 9/9

    दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, नगरसेवक म्हणून काम करतांना जो विकासाचा पॅटर्न राबवला तोच पॅटर्न पुणे शहराच्या विकासासाठी राबवणार असल्याचं वसंत मोरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे.

TOPICS
पुणे न्यूजPune NewsमनसेMNSमराठी बातम्याMarathi Newsराज ठाकरेRaj ThackerayराजकारणPoliticsवंचित बहुजन आघाडीVBA

Web Title: Vba declared vasant more as pune loksabha official candidate spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.