• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. bjp avoided giving chance to senior leaders again in loksabha election 10th list declared spl

Loksabha Election 2024: ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा संधी नाही; दहाव्या उमेदवार यादीत भाजपाने ‘या’ नेत्यांना दिला डच्चू

सलग दोन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकूनही दहाव्या यादीत भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना संधी न देऊन धक्का दिला आहे.

April 11, 2024 15:25 IST
Follow Us
  • BJP has avoided giving chance to senior leaders.
    1/10

    लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १० एप्रिल रोजी उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली. ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्याचे भाजपाने टाळले आहे. (Photo Source- Kirron Kher/Facebook Page)

  • 2/10

    या यादीतही भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना संधी न देऊन धक्का दिला आहे. (Photo Source- Virendra Singh/Facebook Page)

  • 3/10

    ज्येष्ठ अभिनेत्री व चंडीगडमधील भाजपाच्या खासदार किरण खेर यांना यावेळेस संधी दिली नाही. (Photo Source- Kirron Kher/Facebook Page)

  • 4/10

    भाजपाच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशातील बलियाचे खासदार वीरेंद्र सिंह मस्त यांनाही वगळण्यात आले आहे. (Photo Source- Virendra Singh/Facebook Page)

  • 5/10

    या दोन्ही नेत्यांनी सलग दोन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली होती. (Photo Source- Kirron Kher/Facebook Page)

  • 6/10

    चंडीगडमधून किरण खेर यांनी २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पवन बन्सल यांचा पराभव केला होता. पण, त्यांना भाजपाने तिसऱ्यांदा उमेदवारी नाकारली असून, माजी प्रदेशाध्यक्ष संजय टंडन यांना संधी दिली आहे. (Photo Source- Sanjay Tandon/Facebook Page)

  • 7/10

    काँग्रेसमधून भाजपावासी झालेल्या प्रयागराजच्या खासदार रिटा बहुगुणा-जोशी यांनाही पुन्हा उमेदवारी नाकारण्यात आली आहे. (Photo Source- Prof. Rita Bahuguna Joshi/Facebook Page)

  • 8/10

    प्रयागराजमधून सलग दुसऱ्यांदा रिटा बहुगुणा-जोशी यांना संधी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१६ मध्ये काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या बहुगुणा २०१७ मध्ये विधानसभेवर निवडून आल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. (Photo Source- Prof. Rita Bahuguna Joshi/Facebook Page)

  • 9/10

    दरम्यान देशात १९ एप्रिल ते १ जून अशा एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. तर, ४ जून रोजी निकाल लागणार आहे. (Photo Source- Kirron Kher/Facebook Page)

  • 10/10

    हेही पहा- पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या सभेत विरोधकांवर बरसले; म्हणाले, “हे ‘इंडिया’ आघाडीवाले ताकदवान झाले तर..”

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Bjp avoided giving chance to senior leaders again in loksabha election 10th list declared spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.