• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. udhhav thackeray criticizes amit shah devendra fadnavis maharashtra politics spl

Loksabha Election 2024 : उद्धव ठाकरेंची अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, म्हणाले “तुमचे चेलेचपाटे..”

उद्धव ठाकरेंनी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

April 16, 2024 10:39 IST
Follow Us
  • Uddhav Thackeray
    1/9

    लोकसभा निवडणुकीचे टप्पे १९ एप्रिल पासून सुरु होतील. १ जूनपर्यंत ही निवडणूक चालणार आहे.

  • 2/9

    अशात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी अमित शाह आणि उद्धव ठाकरे सोडताना दिसत नाहीत.
    तर देवेंद्र फडणवीसही खास शैलीत टीका करताना दिसतात.

  • 3/9

    उद्धव ठाकरेंनी काल (१५ एप्रिल) रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अमित शाह आणि देवेंद फडणवीस यांना टोले लगावलेत.

  • 4/9

    काही दिवसांपूर्वी अमित शाह म्हणाले होते, “शिवसेना आम्ही फोडलेली नाही. पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं कन्येवर प्रेम असल्याने फुटली” असा उल्लेख अमित शाह यांनी केला होता.

  • 5/9

    आता यावरूनच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर दिलं आहे.

  • 6/9

    “अमित शाह यांचं भाजपातील स्थान काय आहे? आता भाजपाचे अध्यक्ष वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना किती अधिकार आहेत हे तेच सांगू शकतील. “मला अमित शाह यांना सांगायचं आहे की तुम्ही आणि तुमचे चेलेचपाटे वेगळ्या गोष्टी बोलत असतात. तुमच्यात आणि तुमच्या चेलचपाट्यांमध्ये एकवाक्यता असू द्या. काही दिवसांपूर्वी फडणवीस म्हणाले होते की मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो.” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

  • 7/9

    देवेंद्र फडणवीस लग्नात येऊन ३५ पोळ्या खातील आणि नवरा-बायकोमध्ये भांडणं लावतील अशी टीका याआधी उद्धव ठाकरेंनी केली होती. आता उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चेलेचपाटे असा केला आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली होती. आम्ही जर गडकरींच्या कामांची यादी वाचून दाखवली तर तुम्हाला चार पेले कोमट पाणी प्यावं लागेल, असं फडणवीस म्हणाले होते . आता उद्धव ठाकरेंनी त्यांना चेलेचपाटे म्हणत पुन्हा डिवचलं आहे.

  • 8/9

    अमित शाहांना मला सांगायचे आहे की, “तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकप हरलाय. महाराष्ट्रात खुलेआम गुंडाराज सुरु आहे. कोण कोठेही जाऊन गोळीबार करतय. यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. यांचे राज्य चालवण्याकडे कोणतेही लक्ष नाही. तरिही यांना जनतेची मतं पाहिजेत.” अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

  • 9/9

    हेही पहा- Loksabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका; म्हणाले “हा ‘शाही जादूगार’ इतकी..”

TOPICS
अमित शाहAmit Shahउद्धव ठाकरेUddhav Thackerayदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Udhhav thackeray criticizes amit shah devendra fadnavis maharashtra politics spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.