• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. first phase voting begins in maharashtra these are candidates in the election spl

Loksabha Election 2024 Phase 1 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; ‘या’ दिग्गजांचं भवितव्य आज मतदार ठरवणार!

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात एकूण ९७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

Updated: April 19, 2024 12:12 IST
Follow Us
  • maharashtra loksabha election first phase
    1/10

    यंदा १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे. एकूण सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकांचा पहिला टप्पा आज पार पडत आहे. (प्रातिनिधीक फोटो)

  • 2/10

    एकूण ९.२० कोटी मतदार असलेल्या महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात खालील पाच जागांवर कोणत्या उमेदवारांमध्ये होतेय लढत हे जाणून घेऊया. (प्रातिनिधीक फोटो)

  • 3/10

    महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील ५ मतदारसंघांत निवडणूक होत आहे. विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. (प्रातिनिधीक फोटो)

  • 4/10

    नागपूरमध्ये भाजपाचे नितीन गडकरी विरूद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा सामना आहे. या टप्प्यात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी नागपूरमधून जिंकले तर त्यांच्या विजयाची हॅट्ट्रिक होईल.

  • 5/10

    नागपूर जिल्ह्यातील नागपूर इतकाच अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मतदारसंघ म्हणजे रामटेक. येथे महायुतीचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांच्यात लढत आहे.

  • 6/10

    चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाने वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोकर यांच्या पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे.

  • 7/10

    गडचिरोली-चिमूर मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार अशोक नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्यात थेट लढत होत आहे.

  • 8/10

    भंडारा-गोंदिया येथे भाजपाचे सुनील मेंढे महायुतीचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे रिंगणात आहेत.

  • 9/10

    या सर्वांमध्ये कोण काणाला पराजीत करणार? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. या मतदानाची ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर केला जाईल. (फोटो साभार- भारतीय निवडणूक आयोग)

  • 10/10

    हेही पहा- Loksabha Election 2024 : निवडणूक आयोगानं काय केलीय तयारी, किती मतदार करणार मतदान; जाणून घ्या मतदानाचा पहिला टप्पा कसा असणार?

TOPICS
काँग्रेसCongressनिवडणूक आयोगElection Commissionभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionशिवसेनाShiv Sena

Web Title: First phase voting begins in maharashtra these are candidates in the election spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.