• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. congress and oppostion partys on prime minister narendra modi statement spl

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘त्या’ विधानावरुन काँग्रेसचे प्रत्त्युत्तर, निवडणूक आयोगात तक्रार; भाजपावर चौफेर हल्ला

पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर..

April 23, 2024 16:27 IST
Follow Us
  • congress on pm modi
    1/9

    राजस्थानातील बंसवारा येथील प्रचारसभेत रविवारी मोदींनी काँग्रेसवर घणाघाती आरोप केले. (फोटो- BJP/Facebook Page)

  • 2/9

    संपत्तीचे फेरवाटप करण्याचे आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या २००६ मधील राष्ट्रीय विकास परिषदेतील भाषणाचा आधार घेत काँग्रेसवर मुस्लीम अनुनयाचाही आरोप मोदी यांनी केला. (फोटो- BJP/Facebook Page)

  • 3/9

    केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर जास्त मुले असलेल्या ‘घुसखोरां’ना संपत्तीचे फेरवाटप केले जाईल. महिलांची मंगळसूत्रे हिसकावून घेतली जातील, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानांमुळे सोमवारी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. (फोटो- BJP/Facebook Page)

  • 4/9

    या विधानावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये हिंदू वा मुस्लीम हे शब्ददेखील नसल्याचे सांगत लोकांमध्ये भीती पसरवण्याचा योजनाबद्ध प्रयत्न मोदी व भाजपा करत असल्याची टीका पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केली. (फोटो- Mallikarjun kharge/Facebook Page)

  • 5/9

    लोकसभा निवडणुकीत धर्माच्या आधारे दुही निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींनी केला असून त्यांच्याविरोधात त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. याप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी आयोगाची भेट घेऊन अधिकृत तक्रार नोंदवली.(फोटो- BJP/Facebook Page)

  • 6/9

    राहुल गांधींची प्रतिक्रिया काय?
    “मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील निराशेनंतर मोदींच्या खोटेपणाची पातळी इतकी घसरली आहे की, भीतीपोटी ते आता जनतेचे लक्ष मुख्य मुद्द्यांवरून विचलित करू इच्छितात.” (फोटो- Rahul Gandhi/Facebook Page)

  • 7/9

    समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
    “मोदी खोटे बोलतात हे केवळ देशालाच नाही तर संपूर्ण जगाला माहीत आहे. काँग्रेसचे न्यायपत्र आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल ज्या प्रकारे खोटे बोलले ते अत्यंत गलिच्छ राजकारण आहे.” (फोटो- Akhilesh Yadav/Facebook Page)

  • 8/9

    मोदींचे विधान असत्य – डॉ. मुणगेकर
    देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे, असे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कधीच म्हटलेले नाही. डॉ. सिंग यांचा हवाला देत पंतप्रधानांनी केलेले विधान असत्य आहे, असा दावा काँग्रेस नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. मोदी चुकीची माहिती पसरवत आहेत. मुस्लीम समाजाविरोधात देशातील जनतेमध्ये असंतोष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा डाव असल्याचाही त्यांचा आरोप आहे. (फोटो- Bhalchandra Mungekar/Facebook Page)

  • 9/9

    हेही पहा- Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर संजय राऊत म्…

TOPICS
अखिलेश यादवAkhilesh Yadavकाँग्रेसCongressनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsमल्लिकार्जुन खरगेMallikarjun Khargeराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Congress and oppostion partys on prime minister narendra modi statement spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.