• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. bachu kadu meeting in amravati after being denied stadium strongly criticized mp rana spl

Lok Sabha Election 2024 : मैदान प्रकरणाच्या राड्यानंतर अमरावतीमध्ये बच्चू कडूंची सभा; राणांवर जोरदार टीका!

अमरावतीमध्ये सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यात संघर्ष पेटला होता.

Updated: April 24, 2024 19:09 IST
Follow Us
  • amravati bacchu kadu
    1/11

    अमरावती लोकसभा मतदारसंघात आज (दि. २४ एप्रिल) प्रचाराचा शेवटचा दिवस असून सर्वच पक्षांच्या वतीने जोर लावला जात आहे. सर्व फोटो साभार- ( बच्चू कडू, फेसबुक पेज)

  • 2/11

     आज अमरावती येथे भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा संपन्न झाली. मात्र बच्चू कडू यांनी आरक्षित केलेल्या मैदानावर सदर सभा होत असल्यामुळे कालपासून अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण होते.

  • 3/11

    बच्चू कडू यांनी काल पोलिसांसमोर ठिय्या मारून जोरदार आंदोलन केले. तसेच आज एक लाख लोकांना घेऊन अमित शाह यांची सभा होत असलेल्या मैदानावर धडकणार असल्याची घोषणा केली.

  • 4/11

    पण, प्रत्यक्षात दोन्ही सभा वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न झाल्या. यावेळी बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर हल्लाबोल केला.

  • 5/11

    बच्चू कडू यावेळी म्हणाले की, “रवी राणा यांनी सभेचं मैदान बदललं असलं तरी निवडणुकीचं मैदान आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही. मैदान कोणतंही असलं तरी रवी राणा यांना हरविल्याशिवाय राहणार नाही.”

  • 6/11

    “आम्ही परवानगी घेऊन आरक्षित केलेले मैदान हिसकावून घेतल्यानंतर आम्ही आक्रमक व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. आक्रमक झाल्यानंतर आमच्या हातून काहीतरी चूक व्हावी, म्हणजे मला आणि उमेदवार दिनेश बुब यांना तुरुंगात टाकणे सोपे होईल, असे त्यांची योजना होती. पण ही योजना तुमच्या-आमच्या समजंसपणामुळे फोल ठरली.” असे कडू म्हणाले.

  • 7/11

    “आम्ही जर अमित शाह यांच्या सभेची ठिकाणी आंदोलन सुरू ठेवले असते तर आमच्या सभेचा मंडप जाळून टाकण्याची तयारी करण्यात आली होती. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण खेळण्याची तयारी सुरू केली होती. त्यामुळे मी माघार घेतली. राजकारणाचा हिशोब नंतरही पूर्ण करता येईल. पण आता निवडणूक झाल्यावर त्यांना पाहू.” असेही बच्चू कडू म्हणाले.

  • 8/11

     “राणा यांनी दिनेश बुबची सभा रद्द नाही केली तर लोकशाहीचा खून केला. २३ आणि २४ एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाला मैदान दिले होते. २३ तारखेला सकाळी सीईओंनी रवी राणा यांचा मंडप काढून टाकण्याचे आदेश पोलिसांना दिले. पण त्याच सीईओंनी संध्याकाळी आमची सभा रद्द केली”, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

  • 9/11

    “ही लढाई आता दिनेश बुब आणि बच्चू कडू यांच्यापुरती मर्यादीतनाही. एका बाजूला कायदा तोडणारे आणि दुसऱ्या बाजूला कायदा पाळणाऱ्यांची ही लढाई आहे, असेही बच्चू कडू म्हणाले. अमरावतीमध्ये आज पब सुरू झाला आहे. जुगार आणि सट्टे सुरू आहेत. अमरावतीचे पोलीस आयुक्त स्वाभिमानी युवा पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. आमच्या कष्टकरी जनतेच्या पैशांवर तुम्ही हात टाकत असाल तर निवडणुकीनंतर तुम्हाला सोडणार नाही”, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.

  • 10/11

    बच्चू कडू पुढे म्हणाले की, “आजचा आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. मतदानाच्या आधी पैसा वाटला जाण्याची शक्यता आहे. मी निवडणुकीला उभा असताना माझ्या विरोधात उषाताई उभ्या होत्या. तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी “आजीचा बटवा खाली करा आणि बच्चू कडूला जिंकून आणा”, अशी घोषणा दिली होती. तसा मलाही आनंद होत आहे की, या निवडणुकीत राणांचा पैसा बाहेर येत आहे. हा पैसा सामान्य लोकांमध्ये चालला असल्यामुळे आम्ही जिंकलो आहोत. अनधिकृत मार्गाने कमावलेला पैसाही जात आहे आणि खासदारकीही जाईल.”

  • 11/11

    हेही पहा- Lok Sabha Election 2024 : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडे भावनिक; म्हणाल्या…

TOPICS
अमरावतीAmravatiनवनीत राणाNavneet Ranaबच्चू कडूBachchu Kaduभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Bachu kadu meeting in amravati after being denied stadium strongly criticized mp rana spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.