-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली.(सर्व फोटो साभार-राहुल गांधी,फेसबुक पेज)
-
अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाषणात बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांवर टीका केली.
-
सभेत बोलताना राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे सांगत काही मोठ्या घोषणा देखील आज केल्या आहेत.
-
राहुल गांधी म्हणाले, इंडिया आघाडीचं सरकार, काँग्रेसचं सरकार, करोडो लोकांना लखपती कसं बनवणार? हे मी आज तुम्हाला सांगायला आलो आहे.
-
राहुल गांधींनी यावेळी महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाची यादी तयार करून एका महिलेच्या नावावर बँक खात्यात वर्षाला एक लाख रुपये देण्यात येतील.
-
इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर राज्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना दुप्पट मानधन देण्यात येणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
-
देशाच इंडिया आघाडीचं सरकार आलं तर सर्वात आधी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल, अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी अमरावतीत बोलताना केली.
-
याबरोबरच देशातील तरुणांसाठी नोकरीच्या आधी अप्रेंटिसशीप करत असताना एक लाखांचे मानधन दिले जाणार, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली.
-
महिलांना सार्वजनिक क्षेत्रात ५० टक्के आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणाही राहुल गांधी यांनी केली आहे.
-
इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. तसेच शेतकऱ्यांसाठी एक आयोगाची स्थापनाही केली जाईल. त्यामधून शेतकऱ्यांना गरज पडेल तेव्हा कर्जमाफी करण्याची शिफारस हा आयोग करेल
शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी आणि महिलांसाठी राहुल गांधींच्या मोठ्या घोषणा; म्हणाले, “सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा…”
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली
Web Title: Congress leader rahul gandhi explain mahalakshmi scheme for womens in amravati and lok elections 2024 gkt