-
“मी राज्यात जेव्हा मोठा कार्यक्रम केला तेव्हा भाजपच्या वरिष्ठांना सांगितले की, मी माझे काम केले आहे. आता तुम्ही तुमचे काम करा.”
-
“त्यानंतर त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्या हातात दिला. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानतो”, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केले.
-
“राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांना भाजपाचे २० ते २५ आमदार फोडायचे होते”, असा दावाही शिंदे यांनी महायुतीच्या मेळाव्यात केला.
-
ठाणे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ काल महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.
-
‘मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी सर्व गमावले. सोन्यासारखी माणसे सोडून गेली. पक्ष हातातून गेला. बाळासाहेबांचे विचार गेले. पण, मी स्वत:ला भाग्यवान समजतो.”
-
“बाळासाहेबांचे विचार आणि जनता आमच्यासोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही सांगतात की, असली शिवसेना एकनाथ शिंदे यांची तर, नकली शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे.”
-
“मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांची चार ते पाच लोकांना तुरुंगात डांबण्याची योजना होती आणि त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव होते”, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी या मेळाव्यात केला.
-
“देवेंद्र, त्यांचा भाऊ आणि पत्नीची प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. आता देवेंद्र यांना सोडत नाही, त्यांना जेलमध्येच घालतो, असे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले होते,” असे शिंदे म्हणाले.
आपण याला विरोध केला असता उद्धव यांनी भाजपाला घाबरवून त्यांचे २०-२५ आमदार फोडायचे आहेत, असे आपल्याला सांगितले होते, असेही शिंदे म्हणाले. -
“देवेंद्र, त्यांचा भाऊ आणि पत्नीची प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. आता देवेंद्र यांना सोडत नाही, त्यांना जेलमध्येच घालतो, असे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले होते,” असे शिंदे म्हणाले.
आपण याला विरोध केला असता उद्धव यांनी भाजपाला घाबरवून त्यांचे २०-२५ आमदार फोडायचे आहेत, असे आपल्याला सांगितले होते, असेही शिंदे म्हणाले. -
(सर्व फोटो एकनाथ शिंदे या फेसबुक पेजवरुन साभार.)
मुख्यमंत्री शिंदेंचे वक्तव्य: धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी, शाहांचे मानले आभार; उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका
ठाणे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषण केले.
Web Title: Eknath shinde on uddhav thackeray thane latest speech on bjp and narendra modi amit shah devendra fadanvis spl