• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. dcm ajit pawar on mp dr amol kolhe in ambegaon shirur loksabha election public meeting spl

उपमुख्यमंत्री अजित पवारांची खासदार अमोल कोल्हेंवर सडकून टीका; म्हणाले, “पैशांसाठी कोणतीही…”

डॉ. अमोल कोल्हे पैशासाठी कोणतीही भूमिका करत असून त्यांना तत्व नसल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

Updated: May 8, 2024 19:35 IST
Follow Us
  • ajit pawar on amol kolhe
    1/9

    “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केल्यामुळेच मागील निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांना मते मिळाली होती.”

  • 2/9

    “पण, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसे यांची भूमिकाही कोल्हे यांनी केली. हा किती विरोधाभास आहे.”

  • 3/9

    पैशासाठी कोणतीही भूमिका करत असून त्यांना तत्व नसल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. चित्रीकरणात व्यस्त असल्याने त्यांच्याकडे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नसल्याचेही ते म्हणाले.

  • 4/9

    शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारासाठी पवार यांची आंबेगावातील घोडेगाव येथे बुधवारी (८ मे) सभा झाली. शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यावेळी उपस्थित होते.

  • 5/9

    “कोल्हे यांना शोधून आणून उमेदवारी दिली. जीवाचे रान करुन निवडून आणले. मात्र, दोन वर्षांनी मी अभिनेता असल्याचे सांगत राजीनामा घेऊन आले होते, असे सांगत पवार म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांनी १९६७ ला शरद पवार यांना संधी दिली. त्यामुळे ते आपले नेतृत्व सिद्ध करु शकले. पण, पवार यांनी १९८४ ला चव्हाण यांची साथ सोडल्याचे इतिहास सांगतो.”

  • 6/9

    “मला शरद पवार यांनी संधी दिली. पण, आता आम्हाला म्हणतात या वयात पवार यांना सोडायला नको होते. त्यांनी १७ वर्षांत चव्हाण यांना सोडले. मी तर ३५ वर्षे साथ दिली. कारभार बघू द्या म्हटले पण बघू देत नव्हते. चूक केली तर आमचे कान धरा, पण काम करु द्या असे सांगत होते. पण, ऐकत नव्हते.”

  • 7/9

    शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची आम्ही विचारधारा सोडली नाही. त्याच विचारधारेने पुढे जात आहोत. सत्ता असल्याशिवाय लोकांना मदत करु शकत नाही. सत्ता नसल्यावर काही कामे करता येत नाहीत. निधी देता येत नाही, त्यासाठी सत्तेत गेलो”, असेही अजित पवार म्हणाले.

  • 8/9

    “यापूर्वी लोकसभेला आढळराव आणि विधानसभेला दिलीप वळसे-पाटील यांना मतदान होत असे. आता ते दोघेही एकत्र आहेत. त्यामुळे मोठे मताधिक्य मिळाले पाहिजे. कोल्हे यांनी पाच वर्षात पुणे-नाशिक रेल्वे, वाहूतक कोंडी सोडविण्यासाठी काहीच केले नाही. आता भावनिक करतील. रडून प्रश्न सुटणार नाहीत. रडून राजकारण करायचे नसते. आरेला-कारे करुनच राजकारण करायचे असते”, असेही ते म्हणाले.

  • 9/9

    (Photos- Dr Amol Kolhe/FacebookPage & Ajit Pawar/FacebookPage)

TOPICS
अजित पवारAjit Pawarअमोल कोल्हेAmol Kolheमराठी बातम्याMarathi Newsराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Dcm ajit pawar on mp dr amol kolhe in ambegaon shirur loksabha election public meeting spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.