• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. mla suhas kande on chhagan bhujbal nashik loksabha election news maharashtra political news spl

तुतारीचा प्रचार करत असल्याच्या आमदार सुहास कांदेंच्या आरोपांवर छगन भुजबळ म्हणाले…

नाशिकमधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत तर भुजबळ यांनीही उत्तर दिले आहे.

May 10, 2024 13:35 IST
Follow Us
  • chhagan bhujbal today news
    1/9

    “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. राष्ट्रवादीचे नेते तुतारीचा प्रचार करत असून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत”, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

  • 2/9

    “छगन भुजबळ यांना महायुतीमधून मंत्रीपद मिळाले आहे आणि काम करायच्या वेळी ते तुतारीचा प्रचार करत आहेत. तुम्हाला तुतारीचा एवढा पुळका असेल तर तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि खुशाल तुतारीचे काम करा. भाजपाचेही नेते जर शांतपणे हे पाहत असतील तर हे दुर्दैव आहे”, अशी टीका सुहास कांदे यांनी केली.

  • 3/9

    नाशिकमधील नांदगाव विधानसभेत छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे.

  • 4/9

    दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला, यावेळी कांदे यांनी जाहीरपणे हा आरोप केल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील महायुतीमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.

  • 5/9

    सुहास कांदे यांच्या आरोपानंतर छगन भुजबळ यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. आमदार काहीही बोलत असले तरी कार्यकर्त्यांनी मात्र महायुतीचा प्रचार करावा, असे त्यांनी सांगितले.

  • 6/9

    सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद नवीन नाही. याआधीही दोन्ही नेते एकमेकांना भिडले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुहास कांदे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असतानाही दोन्ही नेत्यांमध्ये जाहीर वाद झाले होते.

  • 7/9

    मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीत समावेश झाल्यानंतर आणि सुहास कांदे शिंदे गटाबरबोर राहिल्यानंतर दोन्ही नेत्यांनी आपापसातील वाद मिटवले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये वाद उफाळून आला आहे.

  • 8/9

    नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी याआधी त्यांच्या मतदारसंघाला पालकमंत्री भुजबळ यांनी पुरेसा जिल्हा नियोजन निधी दिला नसल्याचा आरोप केला होता.

  • 9/9

    नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री हे पद छगन भुजबळ यांच्याकडून काढून घ्यावे अशी मागणी कांदे यांनी महाविकास आघाडीत असताना केली होती. (सर्व फोटो छगन भुजबळ आणि सुहास कांदे या फेसबुक पेजवरून साभार.)

TOPICS
छगन भुजबळChhagan BhujbalनाशिकNashikभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionशिवसेनाShiv Sena

Web Title: Mla suhas kande on chhagan bhujbal nashik loksabha election news maharashtra political news spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.