Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. chandrashekhar bawankule on mahavikas aghadi latest statement in media interaction spl

“३०-३५ जागा तर सोडा…” असं म्हणत महाविकास आघाडीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं टीकास्र!

निवडणुकीनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील, असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर बावनकुळे म्हणाले…

Updated: May 10, 2024 16:44 IST
Follow Us
  • chandrashekhar bawankule on maha vikas aghadi,
    1/10

    लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील, असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.

  • 2/10

    त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

  • 3/10

    दरम्यान, यावरून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

  • 4/10

    पृथ्वीराज चव्हाण यांनी उल्लेख केलेले दोन पक्ष म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आहेत, असे ते म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

  • 5/10

    नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
    “पृथ्वीराज चव्हाण जे बोलले, ते खरं आहे. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे दोन पक्ष संपणार आहेत. एकूणच त्यांना असं म्हणायचं होतं की एक शरद पवार आणि दुसरा उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपणार आहेत.”

  • 6/10

    “त्यामुळे सध्या पक्ष विलनीकरणाच्या गोष्टी सुरू आहेत. एक तर शरद पवार उद्धव ठाकरेंबरोबर विलीन होतील, किंवा शरद पवार हे काँग्रेसमध्ये विलीन होतील, कारण शरद पवार यांना माहिती आहे की तुतारी काही वाजणार नाही. तुतारी बंद पडणार आहे”, अशी खोचक टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

  • 7/10

    पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील, या शरद पवार यांच्या दाव्यावरही प्रतिक्रिया दिली.

  • 8/10

    “३०-३५ जाग तर सोडा, शरद पवार यांचा पक्ष सध्या विलनीकरणाच्या स्थितीत पोहोचला आहे”, असे ते म्हणाले.

  • 9/10

    (सर्व फोटो चंद्रशेखर बावनकुळे या फेसबुक पेजवरून साभार.)

  • 10/10

    हेही वाचा- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मिश्किल वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा; वाचा नेमकं क… 

TOPICS
अजित पवारAjit Pawarपृथ्वीराज चव्हाणPrithviraj Chavanभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsमहायुतीMahayutiमहाविकास आघाडीMahavikas AghadiशिवसेनाShiv Sena

Web Title: Chandrashekhar bawankule on mahavikas aghadi latest statement in media interaction spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.