Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. chief minister shinde criticizes uddhav thackeray in the rally speech at dombivli spl

मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; म्हणाले “बाळासाहेबांच्या विचारांना…”

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेते एकमेकांवर टीका करत आहेत, त्यातच आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

May 17, 2024 16:27 IST
Follow Us
    Eknath shinde slams uddhav thackeray
    खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराची मिरवणूक गुरुवारी संध्याकाळी नांदिवली स्वामी समर्थ मठ ते एमआयडीसी भागात आयोजित केली होती.
    या वेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसात मुख्यमंत्री मिरवणुकीत सहभागी झाले होते.
    हा मुसळधार पाऊस म्हणजे आपल्या विजयाची सलामी आणि मोठ्या मताधिक्याची चाहूल आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर आपली जी हिंदुत्वाची विचारधारा जपली. या माध्यमातून शिवसेना वाढवली. त्या हिंदुत्वाच्या विचारधारेला मूठमाती देण्याचे काम आता सुरू आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
    पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “यांना बाळासाहेबांची विचारधारा राहिली नाही. सावरकरांची बदनामी यांना चालते. सावरकरांची बदनामी करणाऱ्यांच्या मांडीजवळ हे बसतात. औरंगजेबाची बाजू हे घेतात.”
     “बॉम्बस्फोटातील याकूब मेमन यांच्या कबरीचे उदात्तीकरण हे करतात. यांच्या प्रचार मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात तरी हे मौन बाळगून आहेत. काश्मीर विषयावर नेहमीच विरोधी भूमिका घेणारे फारुख अब्दुल्ला यांच्या मांडीला मांडी लावून बसतात.”
    “अशा या सर्व विरोधी, नकारात्मक वातावरणात यांचा वावर सुरू आहे. अशा वातावरणात हे कसे जपतील बाळासाहेबांची हिंंदुत्ववादी विचारधारा. यांनी बाळासाहेबांच्या विचारधारेला मूठमाती देण्याचे काम केले आहे”, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. 
    मिरवणुकीत खासदार डॉ. शिंदे, मंत्री संजय राठोड, खा. श्रीरंग बारणे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे सहभागी झाले होते.
    (सर्व फोटो एकनाथ शिंदे या फेसबुक पेजवरून साभार.)
    हेही पहा- पाकिस्तानी झेंड्याच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर! म्हणाले…
TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Chief minister shinde criticizes uddhav thackeray in the rally speech at dombivli spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.