• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. prakash ambedkar slams narendra modi in latest rally at nashik spl

प्रकाश आंबेडकरांचा मोदी गॅंरटीवरून पंतप्रधानांना टोला; ‘मौत का सौदागर’ म्हणत केली टीका!

प्रकाश आंबेडकरांनी मोदी गॅरंटीवरूनही पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. ते नाशिकमधील एका प्रचारसभेत बोलत होते.

May 19, 2024 18:27 IST
Follow Us
  • Prakash Ambedkar slams Narendra modi
    1/11

    पंतप्रधान मोदी हे मौत का सौदागर आहेत, त्यांनी जागतिक पातळीवर बंदी असलेल्या रेमडेसिवीर औषधीला केवळ निवडणूक रोख्यांसाठी भारतात परावानगी दिली, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. 

  • 2/11

    तसेच मोदी गॅरंटीवरूनही त्यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. ते नाशिकमधील एका प्रचारसभेत बोलत होते.

  • 3/11

    काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
    “करोना काळात जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिवीर औषधीवर बंदी घातली होती. या लसीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात, असं त्यांनी सांगितलं होतं.”

  • 4/11

     “मात्र, तरीही भारतात या औषधीला परवानगी देण्यात आली. कारण ही औषध जी कंपनी बनवते, ती कंपनी गुजरातमध्ये आहे आणि या कंपनीचा मालकही गुजराती आहे.”

  • 5/11

    “या औषधीला परवानगी दिल्यानंतर या कंपनीने भाजपाला १८ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे दिले. मुळात ज्या औषधीवर बंदी आणायला हवी होती. ती औषध मोदी सरकारने केवळ स्वत:च्या फायद्यासाठी विकू दिली, त्यामुळे मोदी हे ‘मौत का सौदागर’ आहेत”, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

  • 6/11

    पुढे बोलताना त्यांनी मोदी गॅंरटीवरूनही टोला लगावला. “पंतप्रधान मोदी म्हणतात की आमचे सरकार गॅरंटीचे सरकार आहे. खरं तर लग्न झाल्यावर नवरा बायको एकमेकांना आयुष्यभर एकत्र राहण्याची गॅरंटी देतात. मात्र, मोदींनी ती गॅरंटी पाळली नाही. जी गॅरंटी सात फेरे घेऊनही मोदी पाळू शकत नाही, तर मग त्यांच्या राजकीय गॅरंटीला काय महत्त्व आहे? हा एकप्रकारे जुमला आहे. अग्नीच्या साक्षीने दिलेली गॅरंटी तुम्ही पाळली नाही. तर राजकीय गॅरंटी तुम्ही कशी पाळणार?” असे ते म्हणाले.

  • 7/11

    “या सरकारची आणि दारुड्या लोकांची वृत्ती एकच आहे. दारुडा व्यक्ती दारु पिण्यासाठी घरातलं सामान विकतो. पुढे जाऊन घर विकतो. नरेंद्र मोदीसुद्धा त्याचप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था चालवत आहेत. २०१४ मध्ये भारतीय रेल्वे १०० टक्के सरकारची होती. मात्र, आता २०२४ मध्ये तिचं ७० टक्के खासगीकरण करण्यात आलं आहे. भारतीय रेल्वे ही देशातील लोकांच्या कराच्या पैशातून उभी राहिली आहे. मात्र, आता सरकारकडून तिचं खासगीकरण करण्यात आलं आहे”, असा आरोपही त्यांनी केला.

  • 8/11

    यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक रोख्यांवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. “भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसची भूमिका वेगळी नाही. काँग्रेसच्या काळात टूजी घोटाळा झाला असेल तर मोदींच्या काळात निवडणूक रोख्यांचा घोटाळा झाला. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाने २० हजार कोटी रुपये जमवले. मात्र, हे पैसे जमवण्याची पद्धत घटनाबाह्य होती, हे न्यायालयाने सांगितलं. ज्याप्रमाणे एखाद्या भागातील दादा पानटपरी आणि छोट्या दुकानदारांकडून पैसे वसूल करतो. त्याप्रमाने मोदींनी ईडीचा धाक दाखवून वसुली केली”, असं ते म्हणाले.

  • 9/11

    “नरेंद्र मोदींवर गल्लोगल्लीत सभा घेण्याची वेळ आली आहे. मोदी खोटारडे आहेत. त्यांची भाषा आता बदलायला लागली आहे. स्वत: बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकणार नाहीत, असे म्हणाले. पण आम्ही बाबासाहेबांचे विचारत नाही, आम्ही तुम्ही घटना बदलणार का हे विचारतो आहे. खरं तर बाबासाहेब १९५६ साली गेले. एकदा गेलेली व्यक्ती परत येत नाही. त्यामुळे मोदींनी बाबसाहेबांच्या नावाने आश्वासन देण्यापेक्षा स्व:च्या नावाने आश्वासने द्यावी”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

  • 10/11

    (सर्व फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 11/11

    हेही पहा- उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल! पंतप्रधान मोदी मुंबईतील भाषणात काय म्हणाले?

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiप्रकाश आंबेडकरPrakash Ambedkarभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Prakash ambedkar slams narendra modi in latest rally at nashik spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.