-
आज एनडीएच्या घटक पक्षांची बैठक पार पडली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
काल ४ जुन रोजी अठराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले. त्या पार्श्वभूमीवर २०१९ ची लोकसभा भंग करण्यासाठी मोदी यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (PHOTO- ANI)
-
निकालानंतर देशात अठराव्या लोकसभेचे नवीन सरकार स्थापन करण्यासाठी घडामोडी घडत आहेत. (PHOTO- ANI)
-
एनडीए आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज आयोजित केली गेली होती. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
तर इंडिया आघाडीनेही एक बैठक बोलावली आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे. (PHOTO- ANI)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. १६ जून रोजी १७ व्या लोकसभेची मुदत संपणार आहे. त्याआधी देशात नवीन सरकार स्थापन करावे लागणार आहे. दरम्यानच्या काळात स्वतः राष्ट्रपती देशाचे कामकाज हाती घेतील. (PHOTO- ANI)
-
पुढील सभागृह नेता ठरवण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी आज मोदी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन एनडीए आघाडीची बैठक बोलावली होती.
-
गेल्या दहा वर्षात भाजपाने बहुमतात सरकार स्थापन केले, परतू यावर्षी ४०० पारचा नारा देत निवडणुकीत प्रचार करून भाजपाला २५० जागादेखील मिळाल्या नसल्यामुळे, देशात इंडिया आघाडीही सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेईल अशी चर्चा सुरु आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
दरम्यान, यावेळेस नरेंद्र मोदी नव्या सरकारचे पंतप्रधान झाले तर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी बसणारे ते दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
याआधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर हा विक्रम आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
PHOTOS: नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा; नव्या सरकारसाठी एनडीए आघाडीची पार पडली बैठक
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज पंतप्रधान मोदींनी कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे.
Web Title: Narendra modi handed over the resignation to president droupadi murmu nda meeting for new govt spl