-
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कुटुंबीयांसह मतदान केले. नागपूरमध्ये नितीन गडकरी महायुतीचे उमेदवार आहेत.
-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे कुटुंबीयांसह मतदानाला हजेरी लावली.
-
चंद्रपूरमध्ये महायुतीचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुटुंबीयांसह मतदान केले.
-
रामटेक येथे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी सपत्नीक मतदान केले.
-
नागपूरमध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे उमेदवार आहेत. त्यांनीही कुटुंबीयांसह मतदान केले.
-
भंडारा-गोंदिया येथे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी कुटुंबीयांसह मतदान केले.
-
भंडारा-गोंदिया येथे भाजपाचे सुनील मेंढे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांनी सहकार्यांसह मतदान केले.
-
गडचिरोली-चिमूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी कुटुंबीयांसह मतदान केले.
-
गडचिरोली-चिमूर मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार अशोक नेते उमेदवार आहेत. त्यांनी कुटुंबीयांसह मतदान केले.
-
रामटेकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शामकुमार बर्वे यांनी कुटुंबीयांसह मतदान केले.
Lok Sabha Election 2024 Phase 1 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील उमेदवारांनी कसं केलं मतदान? पहा खास फोटो
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यामध्ये उमेदवारांनी मतदान केलं आहे. त्याचे खास फोटो पहा.
Web Title: How the candidates in the first phase voted in maharashtra see special photos spl