• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from taimur to karan johars twins yash roohi how the starkids celebrated holi dcp

तैमूर पासून करण जोहरच्या यश-रूही पर्यंत स्टारकिड्सने अशी साजरी केली होळी

Updated: September 9, 2021 00:30 IST
Follow Us
  • सोमवारी संपूर्ण देशात होळी हा सण साजरा केला. करोनाचं संकट असल्याने रस्त्यावर होळी साजरी करण्यात आली नाही. मात्र, प्रत्येकाने आपल्या घरीच होळीचा सण उत्साहाने साजरा केला. बॉलिवूडची होळी तर धमाकेदार होळी असते. दरम्यान, त्यांनी ही या वेळी आपल्या कुटुंबासोबतच होळीचा सण साजरा केला. होळी साजरी करताना स्टारकिड्सचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चला तर या गॅलरीच्या माध्यमातून आपण त्यांच्या होळीतील काही फोटो पाहुयात...
    1/10

    सोमवारी संपूर्ण देशात होळी हा सण साजरा केला. करोनाचं संकट असल्याने रस्त्यावर होळी साजरी करण्यात आली नाही. मात्र, प्रत्येकाने आपल्या घरीच होळीचा सण उत्साहाने साजरा केला. बॉलिवूडची होळी तर धमाकेदार होळी असते. दरम्यान, त्यांनी ही या वेळी आपल्या कुटुंबासोबतच होळीचा सण साजरा केला. होळी साजरी करताना स्टारकिड्सचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चला तर या गॅलरीच्या माध्यमातून आपण त्यांच्या होळीतील काही फोटो पाहुयात…

  • 2/10

    तैमूर – बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या मुलाचा तैमूरचा होळी खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. "सुरक्षित रहा, माझ्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा" अशा आशयाचे कॅप्शन तिने त्या फोटोला दिले आहे. (Photo credit – kareena kapoor khan instagram)

  • 3/10

    इनाया – सोहा अली खान आणि कुणाल खेमूची लेक इनाया आहे. या तिघांनीही होळीसाठी सैफच्या घरी हजेरी लावली होती. इनाया आणि तैमूर मज्जा मस्ती करत होळीचा आनंद घेताना दिसत आहेत. (Photo credit – soha pataudi instagram)

  • 4/10

    नितारा – अभिनेता अक्षय कुमारची लाडकी लेक निताराने त्याच्यासोबत होळीचा आनंद घेतला. दोघांचेही चेहरे रंगाने भरलेले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत अक्षयने सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo credit – akshay kumar instagram)

  • 5/10

    यश आणि रूही- यश आणि रूही ही बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरची मुलं आहेत. करणने त्यांच्यासोबत होळी साजरी केली आहे. त्यांचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit – karan johar instagram)

  • 6/10

    अनन्या पांडे – अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या लहानपणीच्या होळीच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. अनन्याने शेअर केलेल्या फोटोत शनाया कपूर आणि शाहरूखची लेक सुहाना खान दिसत आहेत. (Photo credit – ananya pandey instagram)

  • 7/10

    विहान आणि समिषा- विहान आणि समिषा अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची मुलं आहेत. शिल्पाने सोशल मीडियावर तिच्या मुलांसोबत होळी खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत. (Photo credit – shilpa shetty instagram)

  • 8/10

    आराध्या – आराध्या ही विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आहे. ऐश्वर्याने होळीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात आराध्या दिसत आहे. (Photo credit – aishwarya rai bachchan instagram)

  • 9/10

    मेहेर- मेहेर ही अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांची मुलगी आहे. नेहाने मेहेर सोबत होळी खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit – neha dhupia instagram)

  • 10/10

    शहरान आणि इकारा – शहरान आणि इकारा हे दोघे अभिनेता संजय दत्तची मुलं आहेत. संजय दत्तने सोशल मीडियावर कुटुंबासोबत होळी साजरी करतानाचा फोटो शेअर केला आहे. (Photo credit – sanjay dutt instagram)

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: From taimur to karan johars twins yash roohi how the starkids celebrated holi dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.