• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hbd jasmin bhasins innocent style loves ali goni prp

HBD Jasmin Bhasin: साऊथ इंडियन फिल्मपासून केली करिअरला सुरवात, अली गोनीसोबत अफेअर

आज जास्मीन तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करतेय. या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्या संबंधीत काही गोष्टी….

June 28, 2021 13:14 IST
Follow Us
  • टीव्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री जास्मीन भसीन लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. स्वतःच्या बळावर तिने एका दशकापेक्षा ही कमी कालावधीत तिने लोकप्रियता मिळवलीय. आज जास्मीन तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करतेय. या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्या संबंधीत काही गोष्टी....
    1/10

    टीव्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री जास्मीन भसीन लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. स्वतःच्या बळावर तिने एका दशकापेक्षा ही कमी कालावधीत तिने लोकप्रियता मिळवलीय. आज जास्मीन तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करतेय. या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्या संबंधीत काही गोष्टी….

  • 2/10

    खूप कमी लोकांना माहितेय की टीव्ही अभिनेत्री जास्मीन भसीन छोट्या पडद्यावर येण्यापूर्वी आधी साऊथ सिनेमांमध्ये काम करत होती. २०११ मध्ये ती 'वानम' चित्रपटामध्ये झळकली होती. हा एक तमिळ चित्रपट होता. याशिवाय ती कन्नड चित्रपट 'करोडपति' मध्ये सुद्धा तिने काम केलंय. मल्ल्याळम फिल्म 'बी अवेअर ऑफ डॉग्स' आणि तेलगु फिल्म 'वेटा'मध्ये सुद्धा झळकली होती.

  • 3/10

    अभिनेत्री जास्मीनचा जन्म राजस्थानमधल्या कोटा इथे झाला. कॉलेजमध्ये असताना तिने मॉडेलिंगला सुरवात केली. २०१५ मध्ये तिने टीव्ही शो 'टशन-ए-इश्क'मध्ये लीड रोल केला होता.

  • 4/10

    त्यानंतर ती 'दिल से दिल तक' या टीव्ही शोमधून घराघरात पोहोचली. 'जमाई राजा', 'शक्ति अस्तित्व की', 'लाडो', 'वीरपुर की मरदानी', 'बेलन वाली बहू', 'तू आशिकी', 'दिल तो हॅप्पी हे जी', 'कसौटी जिंदगी की', 'यह हैं मोहब्बतें' आणि 'नागिन' सारख्या सुपरहिट टीव्ही शोमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली.

  • 5/10

    तिच्या अभिनयापेक्षा जास्त अभिनेता अली गोनीसोबतच्या अफेअरमुळे ती जास्त चर्चेत आली. २०२० मध्ये जास्मीन बिग बॉस १४ च्या शोमध्ये स्पर्धक बनून गेली होती. यावेळी दोघांचा रोमान्स प्रेक्षकांना खूप आवडला. शोमध्येच दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते.

  • 6/10

    त्यानंतर अलीने शोमध्येच जास्मीनला प्रपोज केले आणि अभिनेत्रीनेही त्याच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले. अली आणि जास्मीनची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती आणि अलीच्या घरच्यांनीही दोघांच्या नात्याला पाठींबा दिला आहे.

  • 7/10

    बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी ती सिंगल असल्याचं सांगितलं होतं. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना तिचं रिलेशनशीप स्टेटस बदललं. जास्मीन सध्या अलीसोबत गोव्यात तिचा वाढदिवस साजरा करतेय. त्यामूळे आता दोघांच्या लग्नाची बातमी ऐकण्यासाठी तिचे चाहते आतुर झालेले आहेत.

  • 8/10

    अभिनेत्री जास्मीनची एकूण संपत्ती जवळपास १,५ मिलियन इतकी आहे. तिने आपल्या अभिनयातून, जाहिराती आणि मॉडेलिंगच्या माध्यमातून इतकी संपत्ती कमावली आहे. याशिवाय मुंबई तिचं स्वतःचं एक घर आणि गाडी सुद्धा आहे.

  • 9/10

    बिग बॉस १४ च्या शोमध्ये तिने एका आठवड्यासाठी ३ लाख रूपये घेतले होते. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी सगळ्यात जास्त रक्कम घेणाऱ्या कलाकारांमध्ये तिचं नाव येतं.

  • 10/10

    जास्मीन तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बरीच सक्रिय असते. नेहमीच ती स्वतःचे ग्लॅमरस फोटोज आणि व्हिडीओज शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtraहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema

Web Title: Hbd jasmin bhasins innocent style loves ali goni prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.