• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. money hiest season 5 all celebrity fans of this netflix show aad

आयुषमान खुराना ते बादशाह; ‘हे’ कलाकार सुद्धा आहेत ‘मनी हाइस्ट’चे चाहते

‘मनी हाइस्ट’च्या पाचव्या आणि शेवटच्या सिझनसाठी काहीच दिवस उरले आहेत.

August 30, 2021 18:47 IST
Follow Us
  • money-hiest-indian-celebs-who-are-fan
    1/13

    नेटफ्लिक्सची 'मनी हाइस्ट’ ही स्पॅनिश वेब सीरिज सध्या बरीच चर्चेत आहे. या वेब सीरिजने अनोख्या कथानकाच्या जोरावर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. यातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतं असून या लक्षवेधी चोरांनी तब्बल चार सिझनमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. (Photo-Indian Express)

  • 2/13

    ‘मनी हाइस्ट’चा पाचवा आणि शेवटचा सिझन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्याचा पहिला भाग ३ सप्टेंबर २०२१ तर दुसरा भाग ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. या लोकप्रिय वेब सीरिजसाठी बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक कलाकार क्रेझी आहेत. (Photo-Indian Express)

  • 3/13

    बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना 'मनी हाइस्ट'चा मोठा फॅन आहे. या सीरिजचा चौथा सिझन प्रदर्शित झाल्यावर त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सीरिजचे अंथम 'बेला चाओ' हे गाणं पियानोवर वाजवतानांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. याच बरोबर त्याने 'मनी हाइस्ट'चा मास्टर माईंड म्हणजे प्रोफेसरची भूमिका साकारायची आहे अशी इच्छा देखील व्यक्त केली. (Photo-Indian Express)

  • 4/13

    आयुषमानने शेअर केलेल्या पोस्टवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कमेंट करत सांगितलं होतं की तिने ही सीरिज एका झटक्यात पाहून संपवली होती. (Photo- Indian Express)

  • 5/13

    रॅपर आणि संगीत दिग्दर्शक बादशाहने आयुषमानच्या पोस्ट वर कमेंट करत त्याला पण या सीरिजमध्ये सहभागी व्हायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे. (Photo-Indian Express)

  • 6/13

    अभिनेत्री हिना खानने हा फोटो शेअर करत ती या सीरिजची फॅन असल्याचे तिच्या फॅन्सना सांगितले होते. (Photo-Indian Express)

  • 7/13

    झोंग हिलरीयो हा एक फिलिपीयन डान्सर आणि अभिनेता आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘मनी हाइस्ट’ची ओळख असलेला मास्क घालून फोटो शेअर केला होता. (Photo-Indian Express)

  • 8/13

    ब्राझिलीयन फुटबॉलपटू नेयमार तर या सीरिजच्या तिसऱ्या सिझनमध्ये एका एपिसोडमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता(Photo-Indian Express)

  • 9/13

    जे.आर.रामिरेज़ ट्विटरद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितलं होतं की मनी हाइस्ट ही बेस्ट सीरिज आहे. (Photo-Indian Express)

  • 10/13

    फिलिपीयन अभिनेत्री अ‍ॅनी कर्टिसच्या फॅन्सने तिच्यात आणि टोकियोची भूमिका साकारणारी अभिनेत्री उर्सुल कोबेरोमध्ये साम्य असलेले काही फोटो शेअर केले होते. ज्याची दखल तिने घेतली होती. (Photo- Indian Express)

  • 11/13

    अमेरिकन गायिका जस्टीन स्कायई देखील अनेक पोस्ट शेअर करत या सीरिज बद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. (Photo-Indian Express)

  • 12/13

    मीना मसूद या ईजिप्शियन कलाकारने अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरी आणि पोस्टद्वारे चाहत्यांना ही सीरिज पाहण्यासाठी आग्रह केला आहे. (Photo-Indian Express)

  • 13/13

    अमेरिकन अभिनेत्री आणि कॉमेडियन मिन्डी कलिंग देखील ‘मनी हाइस्ट’ची खूप मोठी फॅन आहे. (Photo-Indian Express)

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी सिनेमाHindi Cinema

Web Title: Money hiest season 5 all celebrity fans of this netflix show aad

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.