• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. september dhammal these are upcoming web series and movies you must watch aad

सप्टेंबर धम्माल; ‘मनी हाइस्ट’ सोबतच ‘या’ सीरिज आणि चित्रपटांची मेजवानी

सप्टेंबर महिन्यात एका पेक्षा एक वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज

September 1, 2021 15:09 IST
Follow Us
  • september-dhammal
    1/13

    या सप्टेंबर महिन्यात आपल्यासाठी एका पेक्षा एक सीरिज आणि चित्रपटांची मेजवानी तयार आहे. 'मनी हाइस्ट'सोबतच अनेक चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. (Photo-Loksatta File Images)

  • 2/13

    बहूचर्चित आणि बहुप्रतीक्षित सीरिज 'मनी हाइस्ट'चा पाचवा सिझन दोन भागात प्रदर्शित होणार आहेत. पहिला भाग परवा म्हणजेच ३ सप्टेंबर तर दुसरा ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजसाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात उत्सुक झाले आहेत. (Photo-Indian Express)

  • 3/13

    रिचा चड्ढा, रोंनीत रॉय प्रमुख भूमिका असलेली 'कॅंडी' ही थरारक सीरिज ८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.(Photo-Indian Express)

  • 4/13

    'सिंड्रेला' हा रोमँटिक म्युझिकल कॉमेडी चित्रपट आहे. यात गायिका कॅमिला कॅबेलो अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अॅमेझोन प्राइमवर हा चित्रपट ३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.(Photo-Indian Express)

  • 5/13

    'हेलमेट' हा चित्रपट हेल्मेटचा म्हणजेच कंडोमचे महत्व सांगणारा आहे. यात अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी, आशिष वर्मा प्रमुख भूमिका साकारताना दिसतील. हा चित्रपट झी ५ वर ३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.(Photo-Indian Express)

  • 6/13

    एमी अवॉर्ड विनिंग शो 'द मॉर्निंग शो' या सीरिजचा दुसरा सिझन १७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यात जेनिफर अॅनिस्टन प्रमुख भूमिका साकारताना दिसेल. (Photo-Indian Express)

  • 7/13

    लुसिफर- द मॉर्निंग स्टार म्हणत 'लुसिफर' या वेब सीरिजचा साहावा सिझनचा अखेरचा भाग १० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यात अभिनेता टॉम एलिस हा लुसिफरची भूमिका साकारत आहे. (Photo-Indian Express)

  • 8/13

    ‘कोटा फॅक्टरी’ ही कथा आयआयटीची तयारी करणारे विद्यार्थी, कोचिंग सेंटर इंडस्ट्री आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणारे बदल याभोवती फिरते. सादरीकरणात एक नवा प्रयोग करत या सीरिजचा पहिला सिझन ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये दाखवण्यात आला आहे. आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या आणि कठीण परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या आयआयटी इच्छुकांच्या दैनंदिन जीवनातील ताणतणाव, चढउतार यात दाखवण्यात आले आहेत. ही सीरिज २४ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला नेटफ्लिक्सवर येत आहे.(Photo-Indian Express)

  • २००८ मध्ये घडलेल्या मुंबईतील भयानक रात्रीचा एक वेगळा दृष्टिकोन घेऊन 'मुंबई डायरी 26/11' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, टीना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजीत दुबे, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावाडी हे मुख्य भूमिकेत दिसतील. ' ही सीरिज अॅमेझोन प्राइमवर ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.(Photo-Indian Express)
  • 9/13

    दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची प्रमुख भूमिका असलेली 'पवित्र रिश्ता' या मालिकेचा दुसरा सिझन येत्या १५ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यात मानवची भूमिका शाहीर शेख तर अर्चनाची भूमिका अंकिता लोखंडे साकारताना दिसेल. हा दुसरा सिझन झी ५ वर तुम्ही पाहू शकता.(Photo-Indian Express)

  • 10/13

    लग्न, आकर्षण, एकटेपणा यावर आधारित कथा नेटफ्लिक्सच्या 'अनकही कहानी' या सीरिजमध्ये बघायला मिळतील. ही एक शॉर्ट फिल्मची शृंखला असून यात कुणाल कपूर, झोया हुसेन, रिंकु राजगुरू प्रमुख भूमिका साकारताना दिसतील. १७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.(Photo-Indian Express)

  • 11/13

    'सेक्स एज्युकेशन' ही एक ब्रिटिश कॉमेडी-ड्रामा असून यात माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी आणि पालकांच्या  जीवनातील वैयक्तिक दुविधा सांगण्यात आल्या आहेत. सीरिजचा तिसरा सिझन १७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला नेटफ्लिक्सवर येत आहे.(Photo-Indian Express)

  • 12/13

    'क्या मेरी सोनम बेवफा हे' ही उत्तर प्रदेशमधील एक रोमॅंटिक कॉमेंडी आहे.  सुरभी ज्योती, जस्सी गिल प्रमुख भूमिकेत दिसतील, हा चित्रपट झी ५ वर येत्या १० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.(Photo-Indian Express)

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी सिनेमाHindi Cinema

Web Title: September dhammal these are upcoming web series and movies you must watch aad

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.