-
‘मला जे योग्य वाटते तेच मी करते’ असे ठामपणे सांगणाऱ्या राधिका आपटेचा आज वाढदिवस आहे. राधिका आपटे ही अभिनेत्री म्हणून किती गुणी आणि सक्षम आहे हे आपण आतापर्यंतच्या तिच्या चित्रपटातून अनुभवलेले आहेच. तिने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. यातील तिच्या दमदार अभिनयाचे कौतुक देखील झाले आहे.(Loksatta File Images)
-
‘पॅड मॅन’ या चित्रपटात राधिकाने गायत्री लक्ष्मीकांतची भूमिका साकारली होती. (Photo-Loksatta File Images)
-
‘घौउल’ या थरारक चित्रपटात राधिकाने निदा या आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. तिची ही दमदार भूमिका पाहुन प्रेक्षक तिचे कौतुक करत आहेत. (Loksatta File Images)
-
राधिका आपटे, आयुषमान खुराना, टब्बू ची प्रमुख भूमिका असलेला ‘अंदाधूंद’ हा २०१८ सालातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे.(Netflixs)
-
अॅग्रोफोबियाशी झुंज देणारी एक तरुणी, ती या फोबियाचा कसा सामना करते हे यात दाखवण्यात आले आहे. (Photo-Loksatta File Images)
-
‘लस्ट-स्टोरी’ ही शॉर्ट स्टोरीजची शृंखला आहे. यातील राधिकाने साकारलेल्या काकोली या भूमिकेसाठी तिला एमी या मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. (Photo-Youtube)
Birthday Special: राधिका आपटेच्या पाच दमदार भूमिका माहिती आहेत का?
राधिका आपटेने तिच्या दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
Web Title: Happy birthday radhika apte these 5 are best roles played by radhika apte till now aad