-
क्रिकेटर, पोलिटिशियन नवज्योत सिंग यांनी २८ सप्टेंबर रोजी पंजाब कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
-
ही बातमी कळताच सिद्धूसह बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘द कपिल शर्मा शो’ ची स्पेशल परीक्षक अर्चना पूरन सिंग देखील सोशल मीडियावर चांगल्याच ट्रेंड होतं आहेत.
-
पूलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानाची पाठराखण केल्य बद्दल नवज्योत यांना शो मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
-
नंतर परीक्षकाच्या खुर्चीवर अर्चना पूरन सिंग यांनी रिप्लेस करण्यात आलं. सध्या नवज्योत आणि अर्चना यांच्यावर अनेक मीम्स व्हायरल होतं आहेत.
-
नवज्योत यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते पुन्हा कपिल शर्मा मध्ये येणार का?, अशा चर्चा रंगत आहेत.
-
एका मीममध्ये लिहिले होते, “आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत, अर्चना लवकरच पंजांब कॉंग्रेसच्या अध्यक्ष होणार .
-
नवज्योत यांच्यामुळे अर्चना यांचे करिअर संकटात असल्याच्या मीम्स व्हायरल झाल्या आहेत. . -
अर्चना सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात.
-
अनेकदा त्यांच्यावर तयार करण्यात आलेल्या मीम्स त्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.
-
या सर्व मीम्स त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत.
-
ही पोस्ट शेअर करत त्यांनी “अब इसका मै क्या करु?” असे कॅप्शन दिले आहे.
-
अर्चना यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली आहे.
-
नेटकरी या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले, “अर्चनाजी तुम्हालाच बघू शकतो.”
-
एका एपिसोडमध्ये अर्चना यांनी सांगितलं, “सिद्धू यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर मला पुष्कळ फुलांचे पुष्पगुच्छ आणि अभिनंदनाचे मेसेज मिळाले होते”.
-
‘द कपिल शर्मा शो’ च्या तिसऱ्या सिझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शो मध्ये असलेल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
नवज्योत सिंह सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर अर्चना पूरन सिंहचे भन्नाट मीम्स व्हायरल
Web Title: Actress archna puran singh viral memes after navjyot singh sidhu exits punjab congress aad