-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेले १३ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
या शो मधील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे. बर्याच लोकांना कदाचित माहित नसेल, मात्र त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे.
-
तसंच त्यांच्यापैकी काहींनी शिक्षण घेताना त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला आहे.चला तर कलाकारांच्या शैक्षणिक पात्रतेवर एक नजर टाकुयात.
-
जेठालालची भूमिका करणारा अभिनेता दिलीप जोशी याने नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए) पदवी संपादन केली आहे.
-
दयाबेन म्हणजेच दिशा वकानीने ड्रामामध्ये पदवी घेतली आहे. तारक मेहता व्यतिरिक्त तिने ‘जोधा-अकबर’ सारख्या चित्रपटातही काम केले आहे.
-
अभिनेत्री अंबिका रांजनकर मालिकेत कोमल हाथीची भूमिकेत आपण बघतो ती मुंबईतील मिठीबाई कॉलेजमधून सोशियोलॉजीची डिग्री घेतली आहे.
-
मालिकेत बापुजीची भूमिका साकारणारे अमित भट्ट याने वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली आहे.
-
मंदार चांदवाडकर (भिडे मास्टर) हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तो दुबईत काम करत होता. मात्र अभिनयावर प्रेम असल्याने त्याने ती नोकरी सोडली आणि २००० मध्ये भारतात परत आला, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले.
-
या मालिकेत पोपटलालची भूमिका साकारणारा श्याम पाठक हा सी.ए. करत होता परंतु अभिनयावर असलेल्या प्रेमापोटी त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
भिडे मास्टरच्या बायकोची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी हिने इतिहास, फॅशन डिझायनिंग आणि थिएटर मध्ये बी.ए.ची पदवी घेतली आहे.
-
तनुज महाशब्दे मालिकेत अय्यरची भूमिका साकारताना बघायला मिळतो .याने मरीन कम्युनिकेशनमध्ये पदविका पदवी घेतली आहे. तसंच त्यांनी भारतीय विद्या भवन कला केंद्रातून थिएटरचे शिक्षण घेतले आहे.
-
मालिकेतील सर्वात चर्चित पात्र म्हणजे बबीताजी. अभिनेत्री मुनमुन दत्त ही भूमिका साकारताना दिसते. तिने इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी. तिने टेलिव्हिजनवर ‘हम सब बाराती’ या मालिकेमधून पदार्पण केले आहे.
-
शैलेश लोढा हा मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारतो. त्याने बॅचलर ऑफ सायन्स (बीएस.सी) ही पदवी मिळवली आहे आणि मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी देखील पूर्ण केली आहे.
जेठालाल ते बबीताजी; ‘तारक मेहता..’ मालिकेतील कलाकारांकडे आहेत ‘या’ डिग्री
Web Title: Tarak mehta ka oolatta chashma actors eductaional qualification aad