Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday amitabh bachchan know jaya bachchan amitabh bachchan evergreen love story nrp

Happy Birthday Amitabh Bachchan: पहिल्या नजरेत प्रेम अन्…, अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस.

Updated: October 11, 2021 08:35 IST
Follow Us
  • बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या.
    1/20

    बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या.

  • 2/20

    अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत.

  • 3/20

    अमिताभ यांचे कॉलेज जीवनातील, तसेच सिनेसृष्टीतील अनेक किस्से सांगितले जातात. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आपण त्यांची रिअल लाईफ लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत.

  • 4/20

    अभिनेत्री आणि खासदार अशी ओळख असलेल्या जया बच्चन या अमिताभ यांच्या पत्नी आहेत. संसदेत परखड मतं मांडणाऱ्या जया बच्चन यांनी एकेकाळी त्यांच्या अभिनयाने अनेकांना भुरळ घातली आहे.

  • 5/20

    इतकचं नाही तर जया बच्चन आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची लव्ह स्टोरीदेखील खूप खास आहे.

  • 6/20

    सिनेसृष्टीत यशाचं शिखर गाठणाऱ्या बिग बींच्या आयुष्यात जया बच्चन यांची झालेली एण्ट्री आणि त्यांची लव्ह स्टोरीदेखील एखाद्या सिनेमाच्या कथानकाप्रमाणे फिल्मी आहे.

  • 7/20

    जया बच्चन यांच्यामुळेच अमिताभ बच्चन यांचं करिअर चमकलं असही म्हंटलं जातं.

  • 8/20

    करिअरच्या सुरुवातीच्या काळात अमिताभ बच्चन यांचे सलग 12 सिनेमा फ्लॉप झाले. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी कोणतीही अभिनेत्री तयार नव्हती.

  • 9/20

    यानंतर बिग बी मुंबई आणि सिनेसृष्टीला पाठ फिरवणार होते. त्यावेळी त्यांना जंजीर सिनेमासाठी कास्ट करण्यात आलं. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि जया यांची जोडी झळकली.

  • 10/20

    अमिताभ आणि जया या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. या सिनेमानंतर बिग बींच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये नवं वळण आलं.

  • 11/20

    खर तर जया बच्चन पहिल्या नजरेतच बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात पडल्या होत्या. या दोघांची पहिली भेट पुण्यातील फिल्म इंस्टीट्यूटमध्ये झाली.

  • 12/20

    यावेळी जया बच्चन तिथं अभिनयाचे धडे घेत होत्या. तर अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये धक्के खात होते. अमिताभ बच्चन यांच्याबद्दलच्या भावना जया यांनी मैत्रिणींना सांगितल्या होत्या.

  • 13/20

    यावेळी अमिताभ बच्चन खूपच बारीक आणि उचं असल्याने जया बच्चन यांच्या मैत्रिणी त्यांना चिडवत असे. यामुळे जया बच्चन त्यांच्या मैत्रिणीसोबत भांडायच्या.

  • 14/20

    तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी एका मासिकाच्या पानावर जया बच्चन यांचा फोटो पाहिला होता. तेव्हाच त्यांना जया बच्चन आवडल्या होत्या.

  • 15/20

    यानंतर जया आणि अमिताभ बच्चन यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. त्यात ‘जंजीर’ या सिनेमाच्या निमित्ताने दोघांनी भरपूर वेळ एकत्र घालवला.

  • 16/20

    याचवेळी त्यांचं नातं आणखी घट्ट झालं. या सिनेमाला मोठं यश मिळालं होतं. या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी दोघांनाही लंडनला जायचं होतं.

  • 17/20

    यावेळी अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी एक अट घातली. लंडनला जायचं असेल तर आधी लग्न करा आणि मग फिरा.

  • 18/20

    वडिलांच्या आज्ञेचं पालन अमिताभ बच्चन यांनी १९७३ साली जया बच्चन यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आणि दोघांचा संसार सुरू झाला.

  • 19/20

    बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन पहिल्यांदा ‘बंसी बिरजू’ या सिनेमात एकत्र झळकले होते.

  • 20/20

    त्यानंतर ते जंजीर’, ‘अभिमान’, ‘चुपके-चुपके’, ‘मिली’, ‘शोले’ या सिनेमांमधून एकत्र झळकले. त्यांच्या जोडीसा प्रेक्षकांनी मोठी पसंती मिळाली. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Happy birthday amitabh bachchan know jaya bachchan amitabh bachchan evergreen love story nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.