-
झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि अल्पावधीतच प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
-
यामध्ये संकर्षण म्हणताना दिसतोय की, आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार.
-
यावरून तर असंच दिसत की या किचनमध्ये भल्या भल्यांचा कस लागणार आहे.
-
या कार्यक्रमाच्या आगामी भागात पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे या नेते मंडळींनी या सेटवर हजेरी लावली.
-
महाराज म्हणजेच प्रशांत दामले यांनी या तिन्ही नेत्यांना महाराजांच्या आवडीचे पदार्थ करायचं आव्हान दिलं आणि सुरु झाली एक स्पर्धा, पण महाराजांच्या आवडीचे हे पदार्थ तयार करत असताना या मंडळींना अनेक दिव्यातून जावं लागणार.
-
विसरलेले पदार्थ पेठेतून आणण्यासाठी काही ठिकाणी युती तर काहीवेळा खुर्चीसाठी सामना करावा लागणार आहे.
-
या भागात एक विसरलेला सामान मिळवण्यासाठी एक अनोखा संगीतखुर्चीचा सामना देखील रंगला.
-
या तिघांनी सुद्धा मस्त मजेदार किस्से या भागात सांगितले.
-
पंकजा मुंडे यांची गटारी अमावास्येला काय फजिती झाली? प्रणिती शिंदे यांनी पायलट सारखी घोषणा कशी केली? रोहित पवार यांनी संगीतखुर्चीच्या खेळात खुर्चीचा त्यात केला आणि मग काय गुगली टाकली? हे जाणून घेण्यासाठी हा रंजक भाग चुकवू नका.
राजकारणातील तरुण चेहरे जेव्हा स्वयंपाकघरात रमतात… पाहा रोहित पवार, पंकजा मुंडेंचा किचन कल्ला
Web Title: Zee marathi kitchen kalakar pankaja munde rohit pawar praniti shinde maharashtra politicians photos sdn