• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. anil kapoor will be seen in thar with his son harsh vardhan msr

अनिल कपूर ‘थार’मध्ये मुलगा हर्षवर्धनसोबत दिसणार; ‘या’ पिता-पुत्राची जोडी देखील पडद्यावर झळकलेली आहे

पाहा बॉलवूडमधील चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या आणखी काही पिता-पुत्राच्या जोड्या

Updated: April 20, 2022 20:00 IST
Follow Us
  • अनिल कपूरचा 'थार' हा चित्रपट ६ मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अनिल कपूरसोबत त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरही दिसणार आहे. या चित्रपटापूर्वीही अनेकदा बॉलिवूडमधील पिता-पुत्रांची जोडी चित्रपटांमध्ये दिसलेली आहे.
    1/1

    अनिल कपूरचा ‘थार’ हा चित्रपट ६ मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अनिल कपूरसोबत त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरही दिसणार आहे. या चित्रपटापूर्वीही अनेकदा बॉलिवूडमधील पिता-पुत्रांची जोडी चित्रपटांमध्ये दिसलेली आहे.

  • 2/1

    अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी ‘बंटी और बबली’, सरकार राज आणि कभी अलविदा ना कहना यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. दोघांच्या जोडीला पडद्यावर प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे.

  • 3/1

    ‘कोई मिल गया’ या चित्रपटात राकेश रोशन हृतिक रोशनच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

  • 4/1

    याचबरोबर संजय दत्त देखील सुनील दत्त यांच्यासोबत मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात सुनील दत्त यांनी संजयच्या वडिलांचीच भूमिका केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

  • 5/1

    ‘जानशीन’ या चित्रपटात फरदीन खानने त्याचे वडील फिरोज खान यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: फिरोज खान यांनी केले होते.

  • 6/1

    शाहिद कपूर ‘शानदार’ या चित्रपटात वडील पंकज कपूर यांच्यासोबत दिसला होता. याशिवाय ही पिता-पुत्र जोडी जर्सी या चित्रपटातही दिसणार आहे.

  • 7/1

    तर, ‘बेशरम’ या चित्रपटात रणबीर कपूरने वडील ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. हा चित्रपट फ्लॉप ठरला पण दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली.

TOPICS
अनिल कपूरAnil Kapoorअभिषेक बच्चनAbhishek Bachchanअमिताभ बच्चनAmitabh Bachchanहृतिक रोशनHrithik Roshan

Web Title: Anil kapoor will be seen in thar with his son harsh vardhan msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.