-  

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आज वाढदिवस आहे.
 -  
नवाजुद्दीनने बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले.
 -  
बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमवण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला होता.
 -  
प्रचंड मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीनने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
 -  
नवाजुद्दीनने चित्रपटांत दमदार भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात घर केलं.
 -  
‘बजरंगी भाईजान’, ‘ठाकरे’, ‘मांझी’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली.
 -  
उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात नवाजुद्दीनचा जन्म झाला. नवाज लहान असताना त्याच्या घरी टीव्ही देखील नव्हता.
 -  
टीव्हीचे प्रचंड वेड असल्याने तो सर्व सोडून दुसऱ्यांच्या घरी जाऊन टीव्ही बघायचा. त्यावेळीच त्याने अभिनेता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.
 -  
नवाजने १९९६ मध्ये दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले.
 -  
नंतर अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने स्वप्ननगरी मुंबई गाठली.
 -  
आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे नवाजुद्दीनला सुरुवातीला वॉचमन आणि केमिस्ट म्हणून नोकरी करावी लागली होती.
 -  
करिअरच्या सुरुवातीला त्याने चित्रपटात वेटर, चोर यासारख्या छोट्या भूमिकाही साकारल्या आहेत.
 -  
‘शूल’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘सरफरोश’ यांसारख्या चित्रपटांमध्ये नवाजुद्दीन छोट्या भूमिका साकारताना दिसला आहे.
 -  
‘सेक्रेड गेम्स’ वेब सीरिजमधील गणेश गायतोंडे ही भूमिका प्रचंड गाजली.
 -  
आता मात्र बॉलिवूडमधील टॉप कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचं नाव आवर्जून घेतलं जातं.
 -  
कधीकाळी वॉचमनची नोकरी केलेल्या नवाजुद्दीनकडे करोडोंची संपत्ती आहे.
 -  
नवाजुद्दीनने नुकतंच मुंबईत नवं घर घेतलं आहे.
 -  
नवाजुद्दीनचे हे घर मुज्फ्फरनगर येथील बुढानामधील घरासारखे आहे.
 -  
नवाजुद्दीनने या घराचे नाव वडीलांच्या नावावरुन ‘नवाब’ असे ठेवले आहे.
 -  
मीडिया रिपोर्टनुसार, नवाजुद्दीनचं वर्सोवा भागात देखील आलिशान फ्लॅट आहे.
 -  
२०१७ मध्ये त्याने हा फ्लॅट विकत घेतला होता. याची किंमत सुमारे १२ करोड रुपये इतकी आहे.
 -  
याशिवाय नवाजुद्दीनकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे.
 -  
‘मर्सिडीज’, ‘बीएमडब्ल्यू’, ‘ऑडी’ या महागड्या गाड्यांमधून नवाजुद्दीन फिरतो.
 -  
नवाजुद्दीन ‘अद्भूत’, ‘नूरानी चेहरा’, ‘बोले चुडिया’, ‘संगीन’, ‘अफवा’ या आगामी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)
 
Birthday Special : कधीकाळी वॉचमनची नोकरी केलेला नवाजुद्दीन आहे करोडोंचा मालक; आलिशान घर आणि गाड्यांची किंमत माहितीये?
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आज वाढदिवस आहे. नवाजुद्दीनने बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले.
Web Title: Happy birthday nawazuddin siddiqui know about his movies house property car collection photos kak