-  

बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा आज ८ जून रोजी वाढदिवस आहे. डिंपल आज ६५ वयाच्या झाल्या आहेत.
 -  
डिंपल कपाडिया यांनी करीअरमधील पहिल्याच ‘बॉबी’ चित्रपटाच्या यशानंतर त्यावेळचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या बरोबर विवाह केला
 -  
डिंपल यांचा हा निर्णय म्हणजे अनेकांसाठी धक्का होता.
 -  
कारण त्यांच्यासमोर चांगल्या उज्वल भविष्याचा पर्याय असतानाही, त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.
 -  
लग्नानंतर काही काळाने डिंपल यांनी ट्विंकल खन्नाला जन्म दिला.
 -  
त्यांना दोन मुली आहेत. ट्विंकलने २००१ मध्ये अक्षय कुमारसोबत लग्न केले.
 -  
ट्विंकलने अक्षयकुमार सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी डिंपल यांच्यामनात अनेक प्रश्न होते.
 -  
कारण त्यावेळी अक्षय कुमारच्या प्रेमसंबंधांची मीडियामध्ये बरीच चर्चा होती.
 -  
पुढे लग्नानंतर ट्विंकल-अक्षयचा सुखी संसार सुरु झाला आणि त्यांच्या मनातील सर्व प्रश्न मिटले.
 -  
अक्षय कुमारचे सासू डिंपल कपाडियासोबत खूप चांगले बॉन्डिंग आहे.
 -  
अक्षय डिंपल यांची खूप मस्करी सुद्धा करतो.
 -  
एकदा एका पुरस्कार सोहळयात सर्वांसमोर त्याने डिंपल यांची मस्करी केली होती, त्यावेळी सर्वचजण खळखळून हसले होते.
 -  
एकदा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये अक्षयने सासू डिंपल कपाडियांसोबत डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच कारण सांगत अक्षय पुढे म्हणाला, “रात्र भर आम्ही त्यांच्या मुलीविषयी बोलणार.”
 -  
काही काळापूर्वी सोशल मीडियावर अक्षय कुमार आणि त्याची सासू म्हणजे डिंपल कपाडीया यांच्या वयामधील अंतराची चर्चा रंगली होती.
 -  
अक्षय आणि त्याची डिंपल कपाडिया यांच्यामध्ये फक्त १० वर्षांचं अंतर आहे.
 -  
डिंपल कपाडिया यांचा जन्म १९५३ सालचा असून अक्षय कुमारचा जन्म १९६३ मध्ये झाला आहे.
 -  
अक्षय आणि डिंपल कपाडिया यांच्यात सासू व जावई हे नातं असण्यासोबतच ते एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत.
 -  
डिंपल कपाडिया १६ वर्षांच्या असताना त्यांनी १९७३ मध्ये राजेश खन्नासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर वर्षभरानंतर ट्विंकलचा जन्म झाला. (All Photo Credit : Akshay Kumar Instagram/ Twinkle Khanna Instagram/ Indian Express/ File Photo)
 
अक्षयला होती सासू डिंपल कपाडियासोबत डेटवर जाण्याची इच्छा, कारण…
Web Title: Akshay kumar reveals he wanted to go on a date with dimple kapadia find out why dcp