-
‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाने ७ दिवसांमध्ये फक्त ५५ कोटी रुपयांची कमाई केली.
-
या चित्रपटाचे काही शो रद्द देखील करण्यात आले.
-
कंगना रणौतच्या ‘धाकड’ चित्रपटाची देखील तिच परिस्थिती होती.
-
कंगनाचा चित्रपट पाहण्यासाठी एकही प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये नसल्याने हा चित्रपटाचेही शो रद्द करण्यात आले.
-
पण याउलट मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बाजी मारली. अभिनेता प्रसाद ओकच्या ‘धर्मवीर’ चित्रपटाने कोट्यावधी रुपयांची कमाई केली.
-
दहा दिवसात या चित्रपटाने १८.०३ कोटींचा गल्ला जमवला.
-
अभिनेते-दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटानेही विक्रमी कमाई केली.
-
या ऐतिहासिक चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ८.७१ कोटींची कमाई केली.
-
एकूणच काय तर बिग बजेट चित्रपटांपुढे मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. (फोटो – फाईल फोटो)
मराठी चित्रपट हाऊसफुल्ल अन् कंगना रणौत, अक्षय कुमारच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ
अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ तर कंगना रणौतच्या ‘धाकड’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकच चित्रपटगृहामध्ये जात नसल्याने चक्क शोच रद्द करण्यात आले. पण याउलट ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली.
Web Title: Kangana ranaut akshay kumar movie less response from audience and marathi movie more collection on box office kmd