-
झी मराठी वाहिनीवर ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम २९ जुलैपासून प्रसारित होणार आहे.
-
या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली.
-
या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो दाखवण्यात आला.
-
त्यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुम्ही कमी बोलता आणि मी फक्त बोलतच राहते. त्यादिवशी आपली उद्धवजींच्या कॅबिनमध्ये भेट झाली होती. तेव्हा तुम्ही मला सांगितलंच नाही की सुरतला निघणार आहे. तिथे विधानभवनात आपण भेटलो असतो.”
-
“आता मी घरी खूप चिडवते. पवार विरुद्ध शिंदे सुरु होणार. कारण पवार माझे वडील आणि आईचं आडनाव शिंदे. परवा मी दादाला सांगितलं किती मज्जा येणार ना आता…बाबा जिंकणार की आई हे काळच ठरवेल.””
-
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “आपला श्रीकांत मला खूप प्रिय आहे. गोड मुलगा आहे. परवा मला संसदेत भेटला होता. तुम्ही दिल्ली येथे आला होतात पण आपली भेट झालीच नाही. श्रीकांतची भेट होते. श्रीकांत मला खूप प्रिय आहे.”
-
“बघा बाबा आता सगळीकडे खूप पाऊस वगैरे पडत आहे. तसेच ते चिन्हाचंही बघा आता काय होतंय. जरा उरकून टाका आणि कामाला लागूया. सव्वा महिना झाला माझा कामाचा सगळा खोळंबा झाला आहे. कलेक्टरला, अधिकाऱ्यांना फोन केला तर ते म्हणतात अजून मंत्रीच जागेवर नाहीत.”
-
“तेवढं फक्त काम करून घ्या. कारण माझी कामं खूप रखडली आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप कमी बोलता मग मला दडपण येतं. वन वे सारखं आपलं नातं आहे असं वाटतं. भेटूया आपण…धन्यवाद.”
“तुम्ही खूप कमी बोलता अन्…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
झी मराठी वाहिनीवर ‘बस बाई बस’ हा नवा कार्यक्रम २९ जुलैपासून प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
Web Title: Zee marathi show bas bai bas subodh bhave host politician supriya sule as a talk about cm eknath shinde kmd