-
आपण गरोदर असल्याचं अभिनेत्री आलिया भट्टने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो शेअर करत सांगितलं.
-
तिथपासून आलियाबाबत बी-टाउनमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या.
-
आलियाने सध्यातरी तिच्या कामामधून ब्रेक घेतला आहे. ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी आलियाने हजेरी लावली होती.
-
त्यानंतर आलियाने गरोदरपणात खास फोटोशूट केलं आहे.
-
वेस्टर्न ड्रेसमधील तिचं हे हटके फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
आलियाने पिवळ्या रंगाचं जॅकेट, पँट परिधान करत फोटोशूट केलं.
-
तर दुसऱ्या फोटोमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करत आलियाने खास पोझ दिल्या.
-
आलियाच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : गरोदरपणात आलिया भट्टचं ग्लॅमरस फोटोशूट, अभिनेत्रीच्या लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष
अभिनेत्री आलिया भट्टने गरोदरपणात खास फोटोशूट केलं आहे. वेस्टर्न लूकमधील तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. आलियाच्या या नव्या लूकवर आपण एक नजर टाकणार आहोत.
Web Title: Bollywood actress alia bhatt pregnancy photoshoot goes viral on social media see pics kmd