-
दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) बहुचर्चित ‘कॉफी विथ करण’ शोचं (Koffee with Karan 7) सातवं पर्व सुरु झालं आहे.
-
आता या पर्वाच्या नव्या भागामध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हजेरी लावली.
-
या भागामाध्ये करणने आमिर-करीनाला खासगी आयुष्याबाबत तसेच चित्रपटसृष्टीबाबत अनेक प्रश्न विचारले.
-
बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर देखील करणने आमिरला प्रश्न विचारला.
-
‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘केजीएफ’, ‘बाहुबली’सारखे चित्रपट सध्या पाहिले जातात. हिंदीमध्येही असे प्रयोग झाले पाहिजे का? एखादी कोणती अशी गोष्ट आहे की जी हिंदी चित्रपटांमध्ये असली पाहिजे? असा प्रश्न करणने आमिरला विचारला.
-
यावेळी आमिर म्हणाला, “अॅक्शनपट चित्रपट बनवू नका असं मी म्हणत नाही. जे विषय प्रेक्षकांना आपलंस करतील त्याच कथेवर आधारित चित्रपट बनवा.”
-
“हिंदी चित्रपटांमध्ये आपण काही चुकीचं करत आहोत असं माझं मत नाही. कारण प्रत्येक चित्रपट बनवणारा व्यक्ती विचारपूर्वक चित्रपट बनवतो.”
-
“पण प्रेक्षकांना आवडतील अशाच कथांची आपण निवड केली पाहिजे. आपल्यामधील अधिकाधिक लोकांनी हिच गोष्ट अजूनही समजत नाही.”
बॉलिवूड चित्रपट सुपरफ्लॉप होण्यामागचं कारण काय? आमिर खान स्पष्टच बोलला
दिग्दर्शक करण जोहरच्या बहुचर्चित ‘कॉफी विथ करण’ शोच्या (Koffee with Karan 7) सातव्या पर्वामध्ये अभिनेता आमिर खानने हजेरी लावली होती. यावेळी त्याने बॉलिवूड विरुद्ध साऊथवादावर भाष्य केलं.
Web Title: Koffee with karan 7 aamir khan talk about bollywood and south film says we need to improve see details kmd