-
केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे.
-
अभिनेता अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
त्यासोबतच अभिनेत्री अश्विनी महांगडे हीदेखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
-
नुकतीच या तिघांनी शाहीर साबळे यांच्या पसरणी गावाला भेट दिली.
-
पसरणी येथील भैरवनाथ मंदिर येथे शाहीर साबळे यांच्या फोटोचे अनावरण करण्यात आले.
-
यावेळी पसरणी मधील सर्व ग्रामस्थांनी केदार शिंदे आणि पूर्ण टीमचे कौतुक केलेच पण आशीर्वाद आणि शुभेच्छाही दिल्या.
-
अश्विनीने यावेळचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
-
“या सिनेमाशी माझेही नाते जोडले गेले आहे. सिनेमात काम करणे म्हणजे साक्षात पद्मश्री शाहीर साबळे (बाबा) यांच्या प्रती आदर, प्रेम व्यक्त करणे असे मी मानते,” असे तिने म्हटले आहे.
-
या फोटोच्या अनावरणाच्या वेळी एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
-
या कार्यक्रमात केदार शिंदे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं.
-
या चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रतिमा कुलकर्णी यांचे आहेत. तर या चित्रपटाला संगीत अजय- अतुल यांचं असणार आहे.
-
पुढच्या वर्षी म्हणजे २८ एप्रिल २०२३ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या टीमने पसरणी येथे केले शाहीर साबळे यांच्या फोटोचे अनावरण, पहा त्यावेळची खास क्षणचित्रे
शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
Web Title: Ankush chaudhari kedar shinde ashwini mahangade visited pasarni village rnv