-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे. अमृता अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.
-
एप्रिल महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील अमृताच्या ‘चंद्रा’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं होतं.
-
अमृताच्या वाढदिवसानिमित्त याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो प्रसाद ओकने शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.
-
यातील प्रत्येक फोटोला प्रसादने खास कॅप्शन दिलं आहे.
-
पहिला फोटो… आपण वाचन सुरु केलं होतं.
-
दुसरा… आपण रेकीला गेलो होतो तेव्हा बैठ्या लावणीच्या काही “अदा” तू ट्राय करत होतीस.
-
तिसरा… “चंद्रा”ची पहिली लुक टेस्ट.
-
चौथा…दोन वर्षांपूर्वी तुझ्या वाढदिवशीच तुझं शूटिंग चालू झालं होतं.
-
पाचवा…तुझा सगळ्यात आवडता फोटो.
-
सहावा…तुझी आणि मंजूची मस्ती ऑन सेट.
-
सातवा… शूटिंगचा शेवटचा दिवस.
-
आठवा… डबिंगच्या वेळी तुझा आणि मंजूचा टाइमपास.
-
नववा…लूक लॉन्चच्या दिवशी तुझं आणि मंजूचं फोटोशूट.
-
आणि दहावा फोटो काल रात्रीचा…!!!
-
कायम अशीच खुश रहा…तुझ्या सगळ्या इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील. तुला माझ्याकडून आणि मंजूकडून वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर प्रेम…!!! (सर्व फोटो: प्रसाद ओक/इन्स्टाग्राम)
Unseen Photos: ‘चंद्रा’ची पहिली लूक टेस्ट ते शूटिंगचा शेवटचा दिवस, अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकने शेअर केले खास फोटो
अमृता खानविलकरच्या वाढदिवशीच सुरु झालं होतं ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचं शूटिंग, प्रसाद ओकने शेअर केलेले फोटो पाहा
Web Title: Marathi actress amruta khanvilkar birthday special prasad oak shared chandramukhi movie shooting unseen photos kak