-
अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान ही सध्या चर्चेत आहे.
-
काही दिवसांपूर्वी आमिर खानच्या लेकीने गुपचूप साखरपुडा उरकला.
-
तिने तिचा बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेबरोबर साखरपुडा केला आहे.
-
या दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
-
आता आयराने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
आयराने तिच्या साखरपुड्यासाठी लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता.
-
तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती होणारा नवरा नुपूर शिखरेची आई प्रीतम यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे.
-
आयराच्या सासूबाईंनी अगदी पारंपरिक मराठमोळा लूकमध्ये साखरपुड्याला हजेरी लावली होती.
-
साडी परिधान करत त्या आपल्या होणाऱ्या सूनेबरोबर बेभान होऊन नाचताना दिसल्या.
-
शिवाय आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावही आयराच्या सासूबाईंबरोबर मनसोक्त नाचली.
-
“आमच्या साखरपुड्यातील सर्वात मजेशीर व आनंदी व्यक्तीला तुम्ही पाहिलंत का? मला तुमच्यासारखं मनसोक्त जगायचं आहे.” असं आयराने तिच्या सासूबाईंचे फोटो शेअर करताना म्हटलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : मराठमोळ्या सासूबाईंबरोबर बेभान होऊन नाचली आमिर खानची लेक, अभिनेत्याच्या एक्स पत्नीनेही धरला ठेका अन्…
आमिर खानची लेक तिच्या साखरपुड्यामध्ये होणाऱ्या सासूबाईंबरोबर बेभान होऊन नाचली. याचीच एक खास झलक आपण पाहणार आहोत.
Web Title: Aamir khan daughter ira khan engagement ceremony she dance with mother in law see photos kmd