-
अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत आहेत.
-
आता लवकरच त्यांचं लग्न होत असून त्यांच्या लग्नाची तारीख जवळ येत आहे.
-
त्यांचं लग्न कुठे होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक होते. ते ठिकाण आहे सुनील शेट्टी यांचं खंडाळ्यातील आलिशान घर.
-
सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील बंगल्यात हा विवाह सोहळा पार पडणार आहे असं समोर आलं आहे.
-
आलिशान बंगला फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही.
-
या बंगल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
हा बंगला सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध असा आहे.
-
बंगल्याला मोठं आवार आहे. तसंच त्याच्या मागच्या बाजूला मोठं हिरवंगार लॉनही आहे.
-
या घरातील अनेक वस्तू या अँटिक आहेत.
-
तसंच या घराचं फर्निचरही सोबर आहे.
-
लेकीच्या लग्नाची सुनील शेट्टी यांनी या बंगल्यात जय्यत तयारी सुरू केली आहे.
-
२३ जानेवारी रोजी अथिया आणि राहुल या बंगल्यात विवाहबद्ध होणार आहेत.
फोटो सौजन्य: (आथिया शेट्टी, इन्स्टाग्राम)
(एशियन पेंट्स, यूट्यूब)
MI vs GT Live Score: १९ षटकांचा सामना झाल्यास किती धावांचं लक्ष्य मिळणार? काहीच वेळात एका षटकाचा सामना सुरू होणार