-
यामी गौतमी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे.
-
यामी गौतमीला तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात नाकाची प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
-
मात्र, यामीने तो सल्ला मान्य केला नाही. (स्रोत: यामी गौतम/फेसबुक)
-
दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे.
-
दीपिकाने सांगितले होते की, तिला वयाच्या १८ व्या वर्षी ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
-
पण हा सल्ला तिने मानला नाही. (स्रोत: दीपिका पदुकोण/फेसबुक)
-
प्रियांका चोप्रा आघाडीची अभिनेत्री आहे.
-
बॉलिवूडबरोबरच हॉलिवूमध्येही तिने आपली चमक दाखवली आहे.
-
प्रियांकाला काही जणांनी लोकांनी तिच्या जबड्याची प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. (स्रोत: प्रियांका चोप्रा/फेसबुक)
-
अभिनेत्री सोनाली सहगललाही तिच्या करिअरच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
-
एका ऑडिशन दरम्यान एका कास्टिंग डायरेक्टरने तिला शरीराच्या एका भागावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.
-
खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे.
-
ईशा गुप्ताने तिच्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, तिच्या काळ्या रंगामुळे तिला लहानपणी काली मां म्हटले जात होते.
-
चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतरही तिचा अनुभव असाच होता.
-
ईशाचा काळसर रंग पाहून त्याला त्वचा उजळण्यासारखे उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. (स्रोत: ईशा गुप्ता/फेसबुक)
-
सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री मिनिषा लांबाने आपल्या दिलखेचक अदा आणि दमदार अभिनयाने लाखो चाहत्यांचे मन जिंकली आहेत.
-
रणबीर कपूरसोबत ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलं
-
मिनिषालाही सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
-
जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडमधील अघाडीची अभिनेत्री आहे.
-
. अभिनयाबरोबच तिच्या सौंदर्याचेही करोडो चाहते आहेत.
-
जॅकलिनलाही तिच्या करिअरच्या सुरुवातीला नाकाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
-
मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
आपल्या अभिनयाने तिने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.
-
तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवातीला तिला नाकाची आणि स्तनाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
-
अभिनेत्री राधिका मदनने खूप कमी वेळात या बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
-
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अभिनेत्री राधिका मदनला अनेक नकारांचा सामना करावा लागला होता.
-
राधिकाला ऑडिशन दरम्यान शरीराच्या विशिष्ट आकारासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
“तुझं नाक भजीसारखं आहे”; निर्मात्यांनी यामी गौतमीची उडवलेली खिल्ली, ‘या’ अभिनेंत्रींनाही मिळालेला प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला
अभिनेत्रींना इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यानेही लोकांची मने जिंकली आहेत. पण यापैकी अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांना करिअरच्या सुरुवातीलाच प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
Web Title: Actresses who get advice to undergo plastic surgery yami gautam to deepika padukone priyanka chopra jacqueline fernandez dpj