-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ओळखला जातो.
-
या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना नवी ओळख दिली आणि यापैकीच एक कलाकार म्हणजे शिवाली परब.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीचा मोठा चाहतावर्ग तयार झाला.
-
शिवालीदेखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी, तिचे ग्लॅमरस फोटो, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या पडद्यामागील गमतीजमती चाहत्यांशी शेअर करीत असते.
-
तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात.
-
आता शिवालीने तिचा क्रश कोण आहे हे सांगितलं आहे.
-
तिने ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या मनातली एक इच्छा व्यक्त केली आहे.
-
“तुझं क्रश कोण?” असं विचारल्यावर ती म्हणाली, “मला शाहरुख खान खूप आवडतो.”
-
“खूप म्हणजे प्रचंड आवडतो. माझं शाहरुखवर नेक्स्ट लेव्हलचं क्रश आहे.”
-
“अशी माझी इच्छा आहे, मी इंस्टाग्रामला व्हिडीओज बघते की तो सरप्राइज द्यायला कुठेकुठे भेटायला जातो आणि त्यांच्या फॅन्सना भेटून सरप्राइज देतो वगैरे.”
-
“त्यामुळे माझं खूपच क्रश आहे शाहरुखवर.”
-
तिचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे.
“मला तो प्रचंड आवडतो…,” क्रशचं नाव सांगत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने केला मोठा खुलासा
जाणून घ्या कोण आहे शिवाली परबचा क्रश…
Web Title: Shivali parab revealed that she has big crush on shahrukh khan rnv