-
स्पृहा जोशी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे.
-
अनेकदा ती तिच्या लूक्समुळे चर्चेत असते. ती नेहमी तिच्या दिसण्यावर, तिच्या हेअर स्टाईलवर विविध प्रयोग करताना दिसते.
-
गेले काही महिने ती ‘लोकमान्य’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती.
-
आता लवकरच ही मालिका बंद होणार आहे. नुकतंच या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं आणि आता पुन्हा एकदा स्पृहाने तिच्या लूक्सवर प्रयोग करायला सुरुवात केली आहे.
-
स्पृहाने नुकताच तिचा लूक बदलला.
-
या तिच्या नव्या लूकचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
स्पृहाने तिच्या केसांना लाल रंगाने हायलाईट केलं आहे. याचबरोबर नाकात एक छान छोटीशी चमकीही घातली आहे.
-
तिचा हा नवीन लोक सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते तिचा हा नवीन लूक आवडल्याचं सांगत आहेत.
लाल रंगाचे केस अन्…; ऐतिहासिक मालिकेचं शूटिंग संपताच स्पृहा जोशीने बदलला लूक, चाहते म्हणाले…
गेले काही महिने ती ‘लोकमान्य’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. आता या मालिकेचं शूटिंग संपताच तिने तिचा लूक बदलला.
Web Title: Spruha joshi changed her look after completing shooting of lokmanya serial rnv