-
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याने मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे.
-
देसाई यांनी त्यांच्या कर्जतच्या त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत जीवन संपवले.
-
देसाईच्या यांच्या आत्महत्येनंतर मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
-
मराठीसह अनेक हिंदी कलाकारांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.
-
त्यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
-
चंद्रकांत देसाई यांचा जन्म १९६५ साली झाला.
-
देसाई यांनी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं.
-
नितीन देसाई यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शनाचं काम केलं आहे.
-
लगान, जोधा- अकबर, देवदास सारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी त्यांनी भव्य सेट उभारण्याच काम केलं होतं.
-
जवळपास १०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
-
या कामासाठी त्यांना ४ वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
-
एवढंच नाही तर भारतातील सगळ्या मोठा चित्रपट सेट तयार करण्याचा रेकॉर्डही त्यांच्या नवावर आहे.
-
अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपतीचा सेटही चंद्रकांत देसाई यांनीच उभारला होता.
-
२००५ साली त्यांनी कर्जतमध्ये एन. डी. स्टुडिओची स्थापना केली होती.
-
एन. डी. स्टुडिओच्या भव्यदिव्य आवारात ही ‘फिल्मी दुनिया’ हे चित्रपट थिमवर आधारीत पार्कही येथे आहे.
-
या ठिकाणी अनेक सुप्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमाचे सेट आहेत.
-
रामोजी फिल्म सिटीइतकाच नितीन देसाई यांचा एन. डी. स्टुडिओ असल्याचे सांगण्यात येते.
-
फोटो (चंद्रकांत देसाई इन्स्टाग्राम)
४ वेळा राष्ट्रीय पुरस्कार, भारतातील सगळ्या मोठा चित्रपट सेट तयार करण्याचा रेकॉर्ड नावावर असलेले नितीन देसाई कोण होते?
रामोजी फिल्म सिटीइतकाच भव्य एन.डी स्टुडिओही त्यांनी कर्जतमध्ये उभारला होता. नितीन देसाई यांनी त्यांच्या याच स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली
Web Title: Who was national film award winning art director nitin chandrakant desai committed suicide in his n d studio karjat dpj