Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nitin desai suicide case in n d studio audio clips reveals edelweiss loan pmw

“अखेरचा सलाम” ते एन. डी. स्टुडिओचा बचाव; नितीन देसाईंनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?

नितीन देसाईंनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या काही ऑडिओ क्लिप्स पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. (सर्व छायाचित्रे संग्रहीत)

Updated: August 4, 2023 13:30 IST
Follow Us
  • nitin desai commits suicide
    1/13

    सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जतच्या एन. डी. स्टुडिओमध्ये आत्महत्या केली आणि चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली.

  • 2/13

    नितीन देसाईंच्या एन. डी. स्टुडिओवर जवळपास २५० कोटींचं कर्ज असल्याची बाब त्यांच्या आत्महत्येनंतर उघड झाली आहे.

  • 3/13

    नितीन देसाईंनी कर्जबाजारीपणाला कंटाळून किंवा त्या दबावाखाली आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 4/13

    यासंदर्भात पोलिसांना नितीन देसाईंनी मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या काही ऑडिओ क्लिप्स मिळाल्या असून त्यावर तपास केला जात आहे.

  • 5/13

    नितीन देसाईंनी या सगळ्या ऑडिओ क्लिप्स आत्महत्येच्या काही वेळ आधी रेकॉर्ड केल्या नसून त्याआधी काही दिवसांपासून ते रेकॉर्डिंग करत होते अशी माहितीही समोर आली आहे.

  • 6/13

    या ऑडिओ क्लिप्समध्ये नितीन देसाईंनी आपल्या आयुष्याबद्दल, कारकिर्दीबद्दल, करिअरच्या सुरुवातीबद्दल भाष्य केलं आहे.

  • 7/13

    या १० ते ११ ऑडिओ क्लिप्स आहेत. त्यातल्या काही ऑडिओ क्लिप्स १० ते १२ मिनिटांच्या असल्याचंही सांगितलं जात आहे.

  • 8/13

    शिवाय, एन. डी. स्टुडिओ आणि आपल्यावरील कर्जाचा, कर्ज देणाऱ्या कंपनीचाही नितीन देसाईंनी उल्लेख केला आहे.

  • 9/13

    आपल्या पहिल्याच ऑडिओ क्लिपची सुरुवात नितीन देसाईंनी “लालबागच्या राजाला अखेरचा सलाम” असं म्हणून केल्याची माहिती समोर आली आहे.

  • 10/13

    मराठी माणसाने शून्यातून निर्माण केलेला ‘एनडी’ स्टुडिओ अन्य कोणाकडे जाऊ देऊ नका. तो राज्य सरकारने जागेसह ताब्यात घ्यावा. तेथे मोठे स्मारक उभारावे, असं नितीन देसाईंनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

  • 11/13

    कर्ज देऊन आपली फसवणूक करण्यात आली असून, अवास्तव व्याज आकारणीद्वारे एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही देसाईंनी या क्लिप्समध्ये म्हटल्याचं समोर आलं आहे.

  • 12/13

    नितीन देसाईंच्या या ऑडिओ क्लिप्समध्ये चार व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, ही नावं नेमकी कुणाची? याविषयी अद्याप स्पष्टता आलेली नाही.

  • 13/13

    यातल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये नितीन देसाईंनी त्यांची कारकिर्द, रंगमंचावरच्या त्यांच्या कामाची सुरुवात, एन. डी. स्टुडिओची स्थापना अशा गोष्टी सांगितल्या आहेत.

TOPICS
आत्महत्याSuicideमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Nitin desai suicide case in n d studio audio clips reveals edelweiss loan pmw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.