-
विशाखा सुभेदार या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत.
-
१९९८ मध्ये त्यांनी महेश सुभेदार यांच्याशी लग्नगाठ बांधली. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विशाखा यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे.
-
हे दोघेही मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. विशाखा यांना त्यांच्या करिअरमध्ये महेश यांचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे.
-
विशाखा म्हणाल्या, “मी आधी महेशला ‘महेश दादा’ असं म्हणायचे.”
-
“आमची काकस्पर्श या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदा भेट झाली. त्या नाटकात तो काम करायचा आणि त्या नाटकाचं सहाय्यक दिग्दर्शनही त्याने केलं होतं.”
-
“एक दिवस त्यानेच मला सांगितलं की मला दादा म्हणू नकोस. तेव्हा मी खूप लहान होते.”
-
“आजच्या मुली सर्व बाजूंनी विचार करून जोडीदार निवडतात. आमच्या वेळेची पिढी आर्थिक गणितं वगैरे यांचं फार विचार करायची नाही.”
-
“महेशने मला विचारलं. कालांतराने मला त्याचं माझ्यावर लक्ष ठेवणं, माझी काळजी घेणं, माझ्यावर प्रेम करणं आवडू लागलं आणि मी त्याला होकार दिला.”
-
“आमच्या लग्नाला माझ्या घरून आई-वडिलांचा विरोध होता. कारण आधीच माझ्या वडिलांना मी नाटकात काम केलेलं आवडत नव्हतं. त्यातून जावईही नाटकात काम करणारा असल्याने ते आमच्या लग्नाच्या विरोधात होते.”
-
“पण माझ्या आजीने आई-बाबांना सांगितलं, आपल्या मुलीला या क्षेत्राची आवड आहे. सुदैवाने असा मुलगा मिळाला आहे जो तिला क्षेत्रात पुढे काम करण्यासाठी प्रोत्साहन देईल. तर तुम्ही का तिला थांबवून ठेवत आहात? आजीने सांगितल्यावर माझ्या आई-वडिलांनी देखील या बाजूने विचार केला आणि आमच्या लग्नाला संमती दिली.”
-
“माझ्या घरच्यांनी माझ्या आणि महेशच्या लग्नाला परवानगी दिली, पण माझ्या आजी-आजोबांची महेशसमोर एक मोठी अट होती की, आमची मुलगी टीव्हीमध्ये दिसली पाहिजे. ते मात्र माझ्या नवऱ्याने क्षणाक्षणाला जपलं.”
-
“माझ्या आणि महेशच्या नात्याबद्दल घरी कळल्यावर आई १५ दिवस बोलत नव्हती, मग घरी कोंडून फूल एक दुजे के लिए… लहान वयात प्रेमात पडल्यामुळे आमचं लग्नही लवकर झालं. २१ वर्षांची असताना मी लग्न केलं.”
आई-वडिलांचा लग्नाला विरोध अन्..; ‘अशी’ आहे विशाखा सुभेदार यांची फिल्मी लव्हस्टोरी, म्हणाल्या, “घरी आईला कळल्यावर…”
१९९८ मध्ये त्यांनी महेश सुभेदार यांच्याशी लग्नगाठ बांधली.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame vishakha subhedar shares her flimy love story rnv