• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. unch majha zoka fame tejashree walawalkar speaks about her educational background rnv

‘उंच माझा झोका’तील छोटी रमा आता झाली मोठी! तेजश्री वालावलकरचं शिक्षण किती झालंय माहितेय का? घ्या जाणून

गेली काही वर्ष ती मनोरंजन सृष्टीपासून दूर आहे. तर दरम्यानच्या काळात ती काय करत होती? आणि तिचं शिक्षण काय झालं आहे? हे आता तिने सांगितलं आहे.

October 1, 2023 18:26 IST
Follow Us
  • काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर ‘उंच माझा झोका’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रचंड लोकप्रिय झाली.
    1/9

    काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर ‘उंच माझा झोका’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रचंड लोकप्रिय झाली.

  • 2/9

    या मालिकेतून रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास उलगडला गेला. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका तेजश्री वालावलकर हिने साकारली होती.

  • 3/9

    त्यानंतरही तेजश्री काही कलाकृतींमध्ये झळकली. पण गेली काही वर्षं ती मनोरंजन सृष्टीपासून दूर आहे. तर दरम्यानच्या काळात ती काय करत होती आणि तिचं शिक्षण काय झालं आहे हे तिने सांगितलं आहे.

  • 4/9

    ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना तिने सांगितलं, “उंच माझा झोका ही मालिका जेव्हा मी केली तेव्हा मी पाचवीत होते.”

  • 5/9

    “काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर मला ‘उंच माझा झोका’ ही मालिका मिळाली आणि तिने मला घराघरात पोहोचवलं.”

  • 6/9

    “ती मालिका संपल्यानंतर पुढच्या दोन वर्षांत मी ‘मात’ आणि ‘चिंतामणी’ हे दोन चित्रपट केले. पण हे चित्रपट केल्यानंतर माझ्याकडे येणाऱ्या संधी या ‘उंच माझा झोका’ला अनुसरून होत्या किंवा माझ्या वयापेक्षा अगदीच मोठ्या होत्या. त्यामुळे मी अभिनयातून थोडासा ब्रेक घेतला.”

  • 7/9

    “दहावी झाल्यानंतर मी ‘झिंदगी नॉट आउट’ ही मालिका केली. मालिकेच्या शूटिंगमुळे मुंबई-पुणे सारखा प्रवास करणं आणि अभ्यास सांभाळणं हे थोडं कठीण असल्याने मी दहावीनंतर बाहेरूनच कला शाखेचं शिक्षण घेतलं.”

  • 8/9

    “लॉकडाऊनच्या काळात अभिनयाबरोबरच मी प्रोडक्शनबद्दल माहिती घेणं, अभिनयाच्या दृष्टीने वाचन करणं, वेगवेगळे जुने चित्रपट आणि नाटकं बघणं या गोष्टी मी अभ्यासासारख्या करत होते.”

  • 9/9

    “मागच्याच वर्षी माझं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. तर आताही मी व्हीएफएक्सबद्दलची माहिती मिळवत आहे, माझं लिखाणही सुरू आहे. अभिनयाव्यतिरिक्त कलाकृती तयार करताना ज्या ज्या बाजू महत्त्वाच्या असतात त्यांची माहितीकरून घेत आहे.”

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Unch majha zoka fame tejashree walawalkar speaks about her educational background rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.