-
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
अलीकडेच प्राजक्ताचा ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पुढच्या शूटिंगमधून ब्रेक घेत नुकतीच प्राजक्ता तिच्या कर्जत येथील फार्महाऊसवर विश्रांती घ्यायला पोहोचली आहे.
-
प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी कर्जत येथे ‘प्राजक्तकुंज’ नावाचं आलिशान फार्महाऊस खरेदी केलं होतं.
-
“याचसाठी केला होता अट्टाहास…माझा प्रत्येक चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि नव्या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी मी या ‘प्राजक्तकुंज’वर क्षणभर विश्रांती घ्यायला येते” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
-
प्राजक्ताच्या फार्महाऊसचे हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या फोटोमध्ये निसर्गरम्य वातावरणात विश्रांती घेत, प्राजक्ता फरसाणचा आस्वाद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
प्राजक्ताच्या फोटोमध्ये फरसाण पाहून नेटकऱ्यांनी “फरसाणची गोष्ट खरी आहे तर”, “इथेही फरसाण आणलंस”, “फरसाण प्रेमी प्राजक्ता”, “प्राजू नेहमी फरसाण खाते” अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
-
दरम्यान, अभिनेत्रीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
“इथेही फरसाण…”, शूटिंगमधून ब्रेक घेत प्राजक्ता माळी पोहोचली कर्जतच्या फार्महाऊसवर, ‘त्या’ फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्राजक्ता माळी पोहोचली फार्महाऊसवर कारण…; शेअर केले सुंदर फोटो
Web Title: Marathi actress prajakta mali shared new unseen photos of her karjat farmhouse sva 00