-
अभिनेत्री कविता लाड-मेढेकर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील ‘भुवनेश्वरी’ या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-
या मालिकेतील त्यांच्या व्यक्तिरेखेला तुफान प्रतिसाद मिळत असताना त्या मालिकेतून ब्रेक घेत थेट अमेरिकेला गेल्या आहेत.
-
याचं खास कारण म्हणजे त्यांचं नाटक ‘एका लग्नाची पुढची गोष्ट.’
-
प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांचं हे नाटक सर्वत्र हाउसफुल सुरू आहे. तर या नाटकाचे सध्या अमेरिकेत विविध शहरांमध्ये प्रयोग सुरू आहेत.
-
याच नाटकाच्या दौऱ्यानिमित्त त्या जवळपास महिनाभर अमेरिकेला गेल्या आहेत.
-
यादरम्यानचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्या नाटकाच्या टीमबरोबर नाटकाचा हा दौरा खूप एन्जॉय करताना दिसत आहेत.
-
हे फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “फ्रेंड्स, फॅमिली, प्रयोग आणि शॉपिंग.”
-
या फोटोंमध्ये त्यांचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे.
-
तर आता त्यांच्या या फोटोंवर कमेंट करत त्यांचे चाहते त्यांची ही पोस्ट आवडल्याचं सांगत आहेत.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधून ब्रेक घेऊन भुवनेश्वरी गेली अमेरिकेला, मालिकेत करारी भूमिकेत दिसणाऱ्या कविता मेढेकरांचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?
त्यांच्या ‘भुवनेश्वरी’ या व्यक्तिरेखेला तुफान प्रतिसाद मिळत असताना त्या मालिकेतून ब्रेक घेत थेट अमेरिकेला गेल्या आहेत.
Web Title: Actress kavita medhekar went to america for eka lagnachi pudhchi goshta natak rnv