• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • अजित पवार
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rasika sunil expresses her views about replacing spruha joshi in sur nava dhyas nava rnv

“…म्हणून स्पृहाच्या ऐवजी मला ‘सूर नवा ध्यास नवा’साठी विचारण्यात आलं,” रसिका सुनीलने सांगितलं कारण, जाणून घ्या काय म्हणाली अभिनेत्री?

आगामी पर्वाचं सूत्रसंचालन स्पृहा जोशी नाही तर रसिका सुनील करणार हे कळल्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. 

October 7, 2023 18:15 IST
Follow Us
  • ‘सूर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सहावं पर्व - ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
    1/18

    ‘सूर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सहावं पर्व – ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

  • 2/18

    या आगामी पर्वामध्ये सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत स्पृहा जोशीच्या ऐवजी अभिनेत्री रसिका सुनील दिसणार आहे.

  • 3/18

    या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन स्पृहा जोशी नाही तर रसिका सुनील करणार हे कळल्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. 

  • 4/18

    रसिका पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार असल्याने तिचे चाहते खुश झाले, तर दुसरीकडे स्पृहा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार नसल्याने काहींनी निराशा व्यक्त केली. 

  • 5/18

    याबरोबरच काही जणांकडून रसिका आणि स्पृहा यांची सूत्रसंचालिका म्हणून तुलना केली जात आहे.

  • 6/18

    आता या सगळ्यावर रसिकाने भाष्य केलं आहे.

  • 7/18

    ‘लोकसत्ता ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “स्पृहाचं मला अर्थातच खूप कौतुक आहे. सूत्रसंचालनाचा तिचा एक वेगळा बाज आहे, एक वेगळी शैली आहे.”

  • 8/18

    “पण या पर्वात केलेल्या बदलाची तशीच गरज आहे असं त्यांचं म्हणणं होतं.”

  • 9/18

    “कारण आवाज तरुणाईचा अशी थीम आहे आणि या पर्वात अनेक गाणी नव्या अंदाजात सदर केली जातील.”

  • 10/18

    “त्यामुळे हा जो बदल केला गेला आहे तो त्या अनुषंगाने केला गेला आहे.”

  • 11/18

    “पण हे सगळं करत असताना जुन्यालाही आम्ही धरून ठेवणार आहोत. त्यामुळे स्पृहाचा इसेन्सही मला या कार्यक्रमात मिस होऊ द्यायचा नाहीये.”

  • 12/18

    “मी स्वतः तिची खूप मोठी चाहती आहे आणि तिने या आधीच्या पर्वांचं सूत्रसंचालन खरोखर खूप छान केलं आहे.”

  • 13/18

    “त्यामुळे मला आशा आहे की त्याचा समतोल साधत मी माझ्याकडून माझ्या व्यक्तिमत्वातलंही नवीन काहीतरी देऊ शकेन.”

  • 14/18

    पुढे ती म्हणाली, “मला छान वाटतंय की या प्रतिक्रिया चांगल्या अर्थाने विभागल्या गेल्या आहेत. काही मला प्रोत्साहन देत आहेत, तर काहीजण स्पृहाला मिस करत आहेत.”

  • 15/18

    “एखाद्या कलाकाराला ऑनस्क्रीन मिस करणं हे मी अगदीच समजू शकते. कारण काही वर्षांपूर्वी मीही एक मालिका सोडून गेले होते.”

  • 16/18

    “मला असं वाटतं की कलाकार म्हणून तुम्हाला कधी ना कधीतरी याला सामोरं जावं लागतं आणि एका पॉईंटनंतर तुमच्या कामातून प्रेक्षकांकडून तुम्हाला ते प्रेम मिळवावं लागतं आणि मी तेच करत आहे.”

  • 17/18

    तर आता इतक्या समजूतदारपणे या सगळ्याला सामोरी जात असल्याने नेटकरी रसिकाचं कौतुक करत आहेत.

  • 18/18

    याशिवाय आता रसिका स्पृहाचि गादी कशी चालवतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serialsस्पृहा जोशीSpruh Joshi

Web Title: Rasika sunil expresses her views about replacing spruha joshi in sur nava dhyas nava rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.