-
मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जुई गडकरी.
-
‘पुढचं पाऊल’ मालिकेतून जुई घराघरात पोहोचली. या मालिकेतील जुईने साकारलेली कल्याणी भूमिका चांगलीच गाजली.
-
त्यानंतर तिनं काही मालिकांमध्ये काम केलं. तसेच ती छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’मध्येही झळकली.
-
अशी ही मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
-
जुई ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच मालिकेतील अपडेट देखील देत असते.
-
अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी अ क्वेशन’ सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी तिच्या लग्नापासून ते तिच्याकडे कुठल्या गाड्या आहेत? असे बरेच प्रश्न चाहत्यांनी विचारले. या सर्व प्रश्नांची उत्तर तिनं दिली.
-
या सेशनमध्ये तिला एका चाहत्याने विचारलं की, फिटनेससाठी काय करतेस? तू खूप गोड आहेस.
-
चाहत्याच्या या प्रश्नावर जुईने मजेशीर उत्तर दिलं.
-
जुई म्हणाली, “रोज १४ ते १५ तास काम करते. खूप कष्ट करते. त्यामुळेच मी बारीक आहे.”
‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने शेअर केलं तिचं फिटनेस सिक्रेट, अभिनेत्री म्हणाली…
अभिनेत्री जुई गडकरी स्वतःच्या फिटनेसविषयी काय म्हणाली? जाणून घ्या…
Web Title: Tharla tar mag jui gadkari talk about her fitness pps