-

निवेदिता सराफ या गेली अनेक वर्षं विविध नाटकं, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. पण आता निवेदित आहे त्यांचं मूळ नाव नाहीच असा खुलासा त्यांनी केला आहे.
-
निवेदिता सराफ यांनी नुकतीच सौमित्र पोटे यांच्या यूट्यूब चॅनलवरील ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमात एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं.
-
या मुलाखतीत बोलताना त्यांनी त्यांच्या बारशाच्या वेळी त्यांचं नाव निवेदिता ठेवलंच नव्हतं असं सांगितलं.
-
त्या म्हणाल्या, “बबन प्रभू यांनी माझं नाव निवेदिता असं ठेवलं. शाळेत माझं नाव आई-बाबांनी वेगळं ठेवलं होतं ते नाव बबन प्रभू यांनी येऊन बदललं.”
-
“मी खरोखर खूप खुश आहे त्यांनी माझं नाव बदललं.”
-
“माझी बहीण माझ्यापेक्षा साडेचार वर्षांनी मोठी आहे. तिला माझं नाव चंदाराणी असं ठेवाव असं वाटलं. ठीक आहे ती लहान आहे, पण आईने काही नाव ठेवायचा विचार करावा?”
-
या नावामागची गोष्ट सांगत त्या म्हणाल्या, “तेव्हा ‘चंदाराणी का गं दिसतेस तू थकल्यावाणी’ हे गाणं माझ्या बहिणीला खूप आवडायचं.”
-
“त्यामुळे तिला तिच्या धाकट्या बहिणीचे नाव चंदाराणी असे ठेवायचं होतं. ते नंतर बबन काकांनी माझं नाव बदलून निवेदिता असं ठेवलं.”
-
तर आता त्यांचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.
‘हे’ आहे निवेदिता सराफ यांचं मूळ नाव, शाळेत असताना केला नावात बदल, जाणून घ्या काय म्हणाल्या अशोक सराफ यांच्या पत्नी?
त्यांच्या बारशाच्या वेळी त्यांचं नाव निवेदिता ठेवलंच नव्हतं असं त्यांनी सांगितलं.
Web Title: Nivedita saraf reveals her original name and shares the reason to change it rnv