-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेचं नवं पर्व सुरू झालं आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील शिर्के कुटुंबाचा अंत दाखवून मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा २० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
मालिकेच्या नव्या पर्वात जयदीपचा अधिराज म्हणून पुनर्जन्म झाला आहे. यामध्ये तो रांगड्या शेतकऱ्याच्या रुपात झळकला आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
तसेच गौरीचा देखील पुनर्जन्म झाला असून सुशिक्षित नित्याच्या रुपात ती पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
मालिकेतील बऱ्याच जुन्या कलाकारांनी निरोप घेतला असून नव्या कलाकारांची दमदार एन्ट्री झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक नित्याच्या वडिलांच्या भूमिकेत झळकले आहेत.
-
तसेच ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत झळकलेला अभिनेता अमेय बर्वेची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत जबरदस्त एन्ट्री झाली आहे. अमेय नित्याचा खास मित्र ईशांतच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
-
‘रंग माझा वेगळा’ फेम सौंदर्या अर्थात अभिनेत्री हर्षदा खानविलकरही गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथेत झळकल्या आहेत. त्यांनी सरपंच वसुंधरा ही भूमिका साकारली आहे.
-
याशिवाय अधिराजच्या मित्राच्या भूमिकेत अभिनेता मयुर पवार झळकला आहे. तो लवलीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत हर्षदा खानविलकरसह ‘या’ नव्या कलाकारांची दमदार एन्ट्री
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ कोणते नवे कलाकार झळकले? जाणून घ्या…
Web Title: Harshada khanvilakar girish oak amey barve mayur pawar entry in sukh mhanje nakki kay asat marathi serial pps