Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress akshaya naik started her new homestay business in goa see photos sva

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीची मोठी भरारी! मुंबई नव्हे तर ‘या’ भागात सुरू केलं घरगुती हॉटेल, पाहा फोटो…

मराठी अभिनेत्रीने केलं हॉटेल व्यवसायात पदार्पण, फोटो शेअर करत म्हणाली…

Updated: December 4, 2023 20:05 IST
Follow Us
  • अभिनय क्षेत्र सांभाळून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी स्वत:चे विविध व्यवसाय सुरू केले आहेत.
    1/12

    अभिनय क्षेत्र सांभाळून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी स्वत:चे विविध व्यवसाय सुरू केले आहेत.

  • 2/12

    छोट्या पडद्यावरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेत लतिकाची भूमिका साकारणाऱ्या अक्षया नाईकने सुद्धा नुकताच तिचा नवा व्यवसाय सुरू केला आहे.

  • 3/12

    ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरीही अक्षया आता घराघरांत लोकप्रिय झाली आहे.

  • 4/12

    अभिनेत्रीने नुकतंच तिच्या बहिणीच्या जोडीने हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

  • 5/12

    अभिनेत्रीचं मूळ गाव गोव्यात आहे.

  • 6/12

    त्यामुळे अक्षयाने मुंबई सोडून व्यवसाय करण्यासाठी गोव्याची निवड केली आहे.

  • 7/12

    अक्षयाने गोव्यातील तिच्या सुंदर बंगल्याचं रुपांतर घरगुती हॉटेलमध्ये केलं आहे.

  • 8/12

    अक्षयाच्या घरात आता पर्यटकांना भाडं भरून राहता येणार आहे. तिचं हे घरगुती हॉटेल पणजीपासून ८ किलोमीटर अंतरावर आहे.

  • 9/12

    अभिनेत्रीने तिच्या घराचं नाव ‘नाईक होम स्टे’ असं ठेवलं आहे.

  • 10/12

    ‘नाईक होम स्टे’ या सुंदर बंगल्याचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या नव्या व्यवसायाची माहिती तिच्या चाहत्यांना दिली.

  • 11/12

    “गोव्यातील आमचं छोटंसं घर आता तुमचं झालं आहे. रोजच्या आयुष्यातून ब्रेक घेऊन तुम्ही येथे निवांत सुट्टीचा आनंद घेऊ शकता. आमच्या नाईक होम स्टेमध्ये आजपासून तुम्हा सर्वांचं स्वागत आहे.” असं कॅप्शन अक्षयाने तिच्या पोस्टला दिलं आहे.

  • 12/12

    दरम्यान, अक्षयाच्या चाहत्यांनी तिला नव्या व्यवसायासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Actress akshaya naik started her new homestay business in goa see photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.